शेअर ट्रेडिंग (share trading) करून चांगले उत्पन्न मिळू शकते पण त्यात नुकसान होण्याचा, मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे असे समजून अनेक इच्छुक ह्या व्यवसायापासून दूर राहतात.
शेअर ट्रेडिंग करायचे झाल्यास शैक्षणिक पात्रता काय, शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा (how to study the share market), शेअर्सच्या बदलत्या किमातींची अद्ययावत माहिती कशी ठेवावी, हे माहीत नसल्यामुळे अनेक जण शेअर मार्केट ट्रेडिंग (share trading) पासून चार हात लांब राहतात. अपूर्ण माहिती आणि नुकसानाची भिती ह्यांमुळे, हे लोक, यशस्वी व्यवसायाची एक उत्तम संधी गमावतात.
शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय ओनलाईन (online share trading business) पद्धतींने करता येतो. तो करण्यासाठी कोणतेही विशिष्ट शिक्षण असणे गरजेचे नाही. परंतू शेअर मार्केटची माहिती आणि शेअर्सच्या बदलत्या किमतींनुसार खरेदी विक्री बाबत झटपट निर्णय घेण्याची क्षमता मात्र हवी. ह्यासाठी शेअर मार्केट मार्गदर्शन कोर्स (share market course) करणे हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यामधे, शेअर मार्केट म्हणजे काय, ओनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग (online share trading in marathi) कशी करावी, घरी बसून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक (investing in the stock market) कशी करावी अशा गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. शिवाय अत्यंत उपयुक्त अशा शेअर मार्केट टिप्स (share market tips) दिल्या जातात, ज्यायोगे, तुम्हाला यशस्वी रित्या शेअर ट्रेडिंग करता येऊ शकते.
शेअर मार्केट म्हणजे काय? (What is the Share Market?)
जिथे शेअर्स (म्हणजेच स्टॉक्स) ची खरेदी विक्री (ट्रेडिंग) केली जाते, त्याला शेअर मार्केट असे म्हणतात. शेअर मार्केटला स्टॉक मार्केट (stock market) किंवा इक्विटी मार्केट (equity market) असेही संबोधले जाते. हा व्यवसाय ओनलाईन केला जातो.
शेअर ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Share Trading?)
स्टॉक एक्स्चेंग (Stock Exchange) मध्ये अंतरभूत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री म्हणजे शेअर ट्रेडिंग. त्यालाच स्टॉक ट्रेडिंग (stock trading) असेही म्हटले जाते. शेअर ट्रेडिंग करणार्याला शेअर ट्रेडर किंवा स्टॉक ट्रेडर (share trader or stock trader) असे म्हणतात.
शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा?
शेअर मार्केटचे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ञाची मदत घेऊ शकता, ह्या संदर्भातील पुस्तके वाचू शकता, माहितीपर लेख वाचू शकता आणि स्वत:चा ट्रेडिंग आकाउंट उघडून स्टॉक मार्केट अनॅलिसिस (stock market analysis) करू शकता. हे केल्यानंतर तुम्हाला स्टॉक्सची खरेदी विक्री करून पाहता येईल. स्टॉक मार्केटचा अभ्यास करण्यासाठीचा आणि शेअर ट्रेडिंग शिकण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणजे शेअर मार्केट मार्गदर्शनाचे क्लासेस लावणे. ओनलाईन शेअर ट्रेडिंग (online share trading) सुरू करण्याआधी, असा एखादा कोर्स करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. तुमची मातृभाषा जर मराठी असेल तर तुम्हाला शेअर मार्केटचे शिक्षण मराठीतून घेणे सोपे जाईल व स्टॉक ट्रेडिंग (stock trading) समजणे अधिक सुलभ होईल.
ओनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी? (How to Trade in Stocks?)
ओनलाईन शेअर ट्रेडिंग सुरू करायचे असल्यास, पहिल्यांदा तुम्हाला एक चांगला स्टॉक ब्रोकर (stock broker) शोधावा लागेल. त्याच्या मदतीने तुम्हाला डीमाट आकाऊंट (demat account) आणि ट्रेडिंग आकाऊंट (trading account)) उघडता येतील.
ओनलाईन शेअर ट्रेडिंग करायचे असल्यास ही दोन खाती उघडणे आवश्यक आहे. तुमची माहिती भरून आणि काही कागदपत्रे जोडून तुम्हाला ही खाती उघडता येतील. ट्रेडिंग आकाऊंट वापरून तुम्ही स्टॉकच्या खरेदी-विक्रीची ऑर्डर देऊ शकता तर तुम्ही विकत घेतलेले शेअर्स डीमाट आकाऊंटमध्ये डिजिटल स्वरुपात ठेवले जातात.
ही दोन्ही खाती उघडल्यानंतर, ट्रेडिंग खात्यामध्ये तुम्हाला थोडी रक्कम जमा करावी लागेल, जी तुम्ही शेअर्स मध्ये गुंतवणूक (investing in shares) करण्यासाठी वापरू शकाल.
ट्रेडिंग करण्याआधी शेअर मार्केटचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेण्यापूर्वी तुम्हाला त्या कंपनीची माहिती असायला हवी. त्या कंपनीच्या शेअर्सची किम्मत वधारेल का नाही ह्याचा अंदाज असायला हवा, तरंच तुम्ही शेअर्सची निवड योग्य प्रकारे करू शकाल.
कुठल्या स्टॉक्स मध्ये केंव्हा आणि किती रक्कम गुंतवावी, ती केंव्हा काढून घ्यावी आणि दुसर्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवावी हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागेल. स्टॉक मार्केटच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, ज्यायोगे तुम्हाला नफा आणि नुकसानाचा अचूक समतोल साधता येईल.
विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुम्ही सगळी मिळून किती गुंतवणूक (investing in the stock market) करणार आहात आणि आर्थिक पातळीवर तुम्ही किती धोका पत्करू शकता (assess your appetite for financial risk) ह्याचा अंदाज तुम्हाला असायला हवा
ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा आणि शेअर ट्रेडिंग शिकण्याचा (learn share trading) उत्तम मार्ग म्हणजे शेअर मार्केट मार्गदर्शनाचे क्लासेस (share marketing classes). असे क्लासेस घेतल्यावर तुम्हाला घरी बसून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक (investment in the share market) कशी करावी हे कळेल, शेअर मार्केट बद्दलच्या टिप्स (share market tips) मिळतील आणि यशस्वीपणे ओनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग (online share trading)करू शकाल.
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल.अजून कोणत्याही व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा.
शेअर करायला आणि कंमेंट करायला विसरू नका, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी असेल धन्यवाद !!!
***ही पोस्ट अश्या लोकांपर्यंत पोहचवा ज्यांना या माहिती ची गरज आहे पण त्यांना याबद्दल माहिती नाही***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा