सर्वामध्ये काहींना काही हस्तकला बनवण्याचे गुण असतात. आपल्याकडे वेगवेगळ्या सणासुदीला बऱ्याच गोष्टी वापरत असतो.त्या वस्तू आपण कधी कधी घरच्या घरीही बनवतो किंवा बाजारातून विकत आणतो. प्रत्येक सणामध्ये बरेच काही वेगवेगळी कौशल्ये वापरून काही ना काही नवीन हस्तकला बनवत असतो.
प्रत्येक सणाच्या वेळी आपण दरवाज्याभोवती रांगोळी काढतो. ही एक चांगली हस्तकला आहे. काही जण याचा वापर करून रेडिमेड रांगोळी तयार करून ती विकतात.
घरी कंटाळा आल्यावर काही महिला आपल्या घरामध्ये उशी, उशीचे कव्हर, पायपुसणी, दरवाजासाठी तोरण अशा बऱ्याच सजावटीच्या वस्तू घरी बनवतात. हे पण तुम्ही ऑनलाईन विकू शकता.
काही मुली क्लोथ पैंटिंग, ज्वेलरी डिझाईन, मेहंदी डिझाईन, फ्लॉवर पॉट्स, मेकअप, हेअर स्टाईल यात पारंगत असतात. या कलागुणांना ऑनलाईन आणू शकता.
तुमच्याकडे जी कला आहे ती प्रत्येक कला तुम्ही एक नवीन उद्योग म्हणून चालू करू शकतो. जर तुम्ही ह्या कला वापरून ऑफलाईन नफा मिळवत असाल तर कलेचा वापर करून नफा वाढवण्यासाठी ऑनलाईन मदतीने अजून कलेचा प्रचार करू शकता.
प्रत्येकांच्या घरात बघाल तर प्रत्येक जण काहींना काही नवीन सुशोभित वस्तू बनवण्यामध्ये पारंगत असते. विविध कलागुणांना ऑनलाईन मदतीने प्रसार करून तुमच्या कला इतरांपर्यंत तर पोहचवू शकता. त्या कलेचा वापर करून स्वतःचा एक चांगला आहे व्यवसाय उभा करू शकता.
2020पासून सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या हस्तकला पुढीलप्रमाणे आहेत.
स्टैन ग्लास पैंटिंग
स्टैन ग्लास पैंटिंग ची डिमांड खूप आहे. प्रत्येक नवीन घरासाठी किंवा आपण आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी काहीतरी पैंटिंग करत असतो. जर स्टेन ग्लास पैंटिंग येत असेल तर यातून सुद्धा चांगली कमाई करता येते.
पेपर फ्लॉवर्स
जर पेपर फ्लॉवर्स बनवता येत असतील बरेच काही करू शकता. वेगवेगळ्या सणासुदीच्या वेळी मोठमोठ्या मंडळांना मोठमोठी तोरणांची गरज असते. गणपती आणि गौरी डेकोरेशन साठी वेगवेगळ्या सजावटीसाठी पेपर फ्लॉवर्सचा उपयोग करता येतो. वेगवेगळ्या प्रकारची तोरणे, गणपतीसाठी मकर बनवणे, गौरीसाठी सुशोभित दागिने तयार करणे अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पेपर फ्लॉवर्स पासून तयार केल्या जातात.
इको फ्रेंडली वस्तू
इको फ्रेंडली वस्तू तयार करत असाल तर त्या सुद्धा सणासुदीचा वेळी कमाई वाढवू शकता. काही जण इको फ्रेंडली राखी, इको फ्रेंडली गणपती, इको फ्रेंडली गौरी, इको फ्रेंडली डेकोरेशन असे बरेच प्रकारचे उपक्रम राबवले जातात.अशा प्रकारे काही इको फ्रेंडली वस्तू तयार करून घरीबसल्या कमाई करू शकता.
एम्ब्रॉयडरी
जर हॅन्ड एम्ब्रॉयडरी किंवा मशीन एम्ब्रॉयडरी येत असेल तर तुम्ही ड्रेसेस, उशी, बेडशीट ह्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून विकू शकता.
क्रोचेट
जर क्रोचेट वर्क करत असाल तर वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या सुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे विकू शकाल. वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून त्या विक्री करू शकता.
वूड वर्क
जर लाकडाच्या विविध वस्तू बनवण्यामध्ये पारंगत असाल तर लाकडाच्या विविध वस्तू तयार करून त्या सुद्धा तुमच्या लोकल ठिकाणी विक्री करून नफा मिळवू शकता.हळूहळू सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग करून व्यवसाय अजून चांगला वाढवू शकता.
किचेन्स
जर विविध प्रकारच्या किचेन्स बनवता येत असतील तर हा व्यवसाय सुद्धा चांगल्या रीतीने करू शकता. फक्त ती कला चांगली अवगत असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सतत काही तरी नवीन निर्माण करता आले पाहिजे.
छोट्या छोट्या टेडी च्या किचेन्स सध्या जास्त बाजारात विकल्या जातात. त्याला सध्या खूप मागणी आहे. जर अशा प्रकारच्या किचेन बनवत असाल तर यातून चांगली कमाई करू शकता.
ज्वेलरी डिझाईन
ज्वेलरी डिझाईन हा एक चांगला घरीबसल्या करता येणार उद्योग करता येण्यासारखा आहे.गौरी गणपतीच्या वेळी किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवासाठी विविध प्रकारचे दागिने बनवत असतो.
नवीन नवीन कानातले, गळ्यातले, बँगेल्स, ब्रेसलेट्स,अंकलेट्स यांची खूप मागणी आहे.अशा प्रकारच्या विविध दागिन्यांचा एक चांगला उद्योग होऊ शकतो.
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा