नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!
आज या भागात फुलांची सजावट या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.
विविध प्रकारच्या फुलांचे डेकोरेशन करून ते बऱ्याच समारंभामध्ये किंवा सणासुदीसाठी वापरले जाते.वेगवेगळ्या आकर्षक डेकोरेशनसाठी सध्या खूप मागणी आहे.
लग्नसमारंभासाठी तर भरपूर फुलांच्या डेकोरेशनची मागणी असते.तसेच दिवाळी आणि दसरा यावेळी विविध फुलांचे डेकोरेशन करून प्रत्येक घराच्या दरवाजाच्या चौकटीला लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे.
अशा प्रकारच्या सजावटी करून सुद्धा एक चांगला व्यवसाय उभारू शकता. जर फुलांची आवड असेल आणि अशा वेगवेगळ्या सजावटी बनवायला आवडत असतील तर अशा प्रकारच्या व्यवसाय करू शकता.
काही समारंभामध्ये मोठमोठ्या फुलांच्या कमानी तयार केल्या जातात. काही ठिकाण समारंभासाठी गेलो कि तिथे फुलांचे बनवलेले बुके गिफ्ट च्या ऐवजी दिले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारची फुले आणून फुलांचा व्यवसाय चालू करू शकता.
वेगवेगळी फुले आणि त्याबरोबर शोभेची पाने किंवा वेळ ह्यांना एका लाकडी बेसवर व्यवस्थित कौशल्याप्रमाणे लावून घेऊन नंतर ते त्या बेसवर एका फोममध्ये लावून घेऊन डेकोरेट करू शकता.यात अजून वेगवेगळ्या प्रकारे बेस वापरून वेगवेगळ्या प्रकारे फुले लावून घेऊ शकता. अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे बुके तयार करून ऑर्डर येईल त्याप्रमाणे विकू शकता.
यामधे वेगवेगळी फुले सुद्धा विकू शकता अथवा बुके बनवून सुद्धा विकू शकता. मोठमोठया हॉटेल्समध्ये फुलांना आणि फुलांच्या डेकोरेशनसाठी खूप मागणी असते.मोठ्या हॉटेल्सना कॉन्टॅक्ट करून व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. त्यामुळे आपणास एक कायमचा ग्राहक मिळून जाईल.जर फुले किंवा फुलांचे हार विकणार असाल तर वेगवेगळ्या सोसायटी किंवा मंदिरामध्ये जाऊन तेथील हार तयार करण्यासाठी तयार केलेले हार व फुले त्यांना विकत देऊ शकता.
त्यामुळे फुलांच्या व्यवसायामध्ये भरपूर नफा मिळवू शकता. जशा ऑर्डर्स मिळत जातील तसा व्यवसाय वाढवू शकता.
फुले सजावट व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा | Place
फुले सजावट करून व्यवसाय करणार असाल तर त्यासाठी एखादी चांगली मोक्याची जागा निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी जिथे लोकांची जास्त वर्दळ असते अशा ठिकाणी हा व्यवसाय चालू करू शकता.
काही ठिकाणी पेट्रोल पम्पाजवळ लोक आपला फुलांचा स्टॉल मांडतात आणि फुलांचा व्यवसाय चालू करतात.
काही जण मंदिरासमोर किंवा कार्यालयासमोर आपला स्टॉल तयार करून हा व्यवसाय चालू करतात. अशाच प्रकारे आपला व्यवसाय सोयीनुसार चांगली लोकांची गर्दी असेल अशा ठिकाणी जागा निवडून आपला फुलांचा व्यवसाय उभारू शकता.
गुंतवणूक | Investment.
जर जागेसाठी जास्त इन्व्हेस्ट करणार असाल किंवा बजेटमध्ये ते बसत असेल तर हा व्यवसाय एका मोक्याच्या ठिकाणी एक चांगले दुकान बघून तिथे स्वतःचे दुकान उभारू शकता. जर जागेत इन्व्हेस्ट करणार नसाल तर घरच्या घरी देखील हा व्यवसाय चालू करू शकता. त्यासाठी कुठेही जागा कुठे बघण्याची गरज भासणार नाही. अशा रीतीने बजेटप्रमाणे जागा निवडून किंवा घरच्या ठिकाणी हा व्यवसाय चालू करू शकता.
फुले सजावटीसाठी कलाकौशल्ये वापरून विविध कल्पना | flower decoration ideas.
फुले सजावटीसाठी बऱ्याच प्रकारच्या विविध समारंभाप्रमाणे लागणाऱ्या सजावटी करू शकतो. जसे कि लग्नसमारंभासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या कमानी तयार करू शकतो. त्याबरोरच गाडीसाठी विविध प्रकारच्या फुलांचे डेकोरेशन तयार करू शकता. सणासुदीला लागणाऱ्या चौकटीसाठी विविध प्रकारचे हार तयार करू शकतो.
तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी बेस आणून विविध प्रकारच्या कलाकौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे बुके तयार करू शकता. वेगवेगळ्या साईजमध्ये बुके तयार करून विकू शकता. छोटेसे लाकडी फ्लॉवरपॉट सुद्धा तयार करून विकू शकता.अनेक प्रकारच्या कल्पना आणि कलाकौशल्ये वापरून फुलांचा व्यवसाय करू शकता.
फुले सजावटीसाठी लागणारे साहित्य आणि त्याचा खर्च | Flower decoration material and investment
सजावटी साठी लागणारी फुले आणि झाडांचे कटिंग्स जसे कि पाने मोठ्या प्रमाणातून मार्केटमधून आणून घेऊ शकता. जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे साहित्य मागवून घेऊ शकता. तसेच त्याबरोबर लागणारे सजावटीचे साहित्य होलसेल दुकानातून घेऊ शकता. त्यासाठी बजेटप्रमाणे खर्च मॅनेज करून फुले आणि इतर कटिंग्स ऑर्डरप्रमाणे आणणे योग्य ठरते. सर्वप्रथम फुले सजावटीसाठी च्या अगोदरच ऑर्डर्स घेऊन त्यासाठी किती खर्च येईल तो काढून त्याप्रमाणे सर्व साहित्य मागवून घेऊ शकता.
इतर जे साहित्य आहे ते अगोदरच मागवून घेऊ शकता. जे साहित्य खराब होत नाही ते आणून ठेवू शकता आणि जे साहित्य लवकर खराब होते ते साहित्य ऑर्डरप्रमाणे जसे लागेल तसे मागवून घेऊ शकता
फुले सजावटीसाठी ट्रेनिंग | Training for flower decoration.
फुले सजावट करण्यासाठी जर ट्रेनिंग घ्यायची अशी गरज लागत नाही. जर अगोदरच ह्या सर्व गोष्टी जमत असतील तर ट्रेनिंग घ्यायची काहीही गरज लागणार नाही. ज्यांना ह्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर शहरामध्ये याचे ट्रेनिंग प्रोग्राम चालवले जातात तिथून प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करू शकता.ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत ते करून पण घरी सराव करून घरच्या घरी ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. त्यामुळे ह्यासाठी वेगळे ट्रेनिंग घ्यायची गरज लागत नाही किंवा ट्रेनिंगसाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही.
फुले सजावटीसाठी मशीन | Machine for flower decorati
फुले सजावटीच्या व्यवसायासाठी कोणत्याच मशीनची गरज लागत नाही कोणत्याही मशिनशिवाय हा व्यवसाय चालू करू शकता. फक्त फुले सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वास्तूसाठी कोणी होलसेलर बघून त्याकडून सगळे साहित्य आणावे लागते. आणि सजावट करु शकता. त्यासाठी कोणत्याही मशीनची गरज लागणार नाही
लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and Registrati
ह्या व्यवसायासाठी तु उद्योग आधार आणि शॉप ॲक्ट हे लायसन्स लागेल. तसेच GST रेजिस्ट्रेशन सुद्धा करणे ह्या व्यवसायासाठी आवश्यक आहे. इतर काही लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन यासाठी सरकारी कार्यालयामध्ये चौकशी करून अजून इतर माहिती मिळवू शकता. जर स्वतःचा चांगला ब्रँड स्थापित करायचा असेल तर ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन सुद्धा करून घेऊ शकता.
फुलाच्या डेकोरेशन साठी पॅकेजिंग | Packaging for flower decoration.
डेकोरेशन केलेले फ्लॉवर्स पॅक करण्यासाठी किंवा बुकेसाठी प्लास्टिकचे मोठे कागद वापरू शकता. पॅकिंग करताना फुले व्यवस्थित राहण्यासाठी प्लॅस्टिकच्या बागेमध्ये किंवा गोल प्लास्टिकचा कागद गुंडाळून डेकोरेशन पॅक करू शकता. मोठे हार किंवा कमानीसाठी पॅकिंग मोठ्या बॉक्समध्ये पॅकेजिंग करू शकता.
फुलाच्या व्यवसायासाठी लागणारा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट | Investment for flower decoration busine
फुलांच्या डेकोरेशनसाठी व्यवसायासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी सुरुवातीला थोडे पैसे खर्च करावे लागतील. फुले किंवा इतर साहित्य जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे खर्च करू शकता.ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे अगोदर ग्राहकाकडून ऍडव्हान्स घेऊन काम चालू करू शकता. त्यामुळे फुलांच्या व्यवसायासाठी कमीत कमी खर्चामध्ये व्यवसाय चालू करू शकता. फुलांच्या व्यवसायासाठी जागेसाठी खर्च करणार असाल तर ते बजेटप्रमाणे ठरवून घेऊ शकता.
फुलाच्या व्यवसायासाठी लागणारा स्टाफ | Staff for flower decoration busine
या व्यवसायासाठी सुरुवातीला कोणताही स्टाफ ठेवण्याची गरज नाही.ऑर्डर्स जशा वाढत जातील त्याप्रमाणे कामासाठी अजून काही कारागीर ठेवू शकता. सुरुवातीला स्वतः किंवा मदतीला कुणीतरी एक मदतनीस ठेवून व्यवसाय चालू करू शकता. त्यामुळे स्टाफ किंवा कामगारांसाठी ह्या व्यवसायाला वेगळा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही.लागणार स्टाफ किंवा कारागीर ऑर्डर्सप्रमाणे आणि नफा किती मिळतोय त्याप्रमाणे ठरवू शकता.
फुलाच्या डेकोरेशन व्यवसायासाठी मार्केटिंग | Marketing for flower decoration busine
मार्केटिंग पब्लिक जागेमध्ये पोस्टर लावून करू शकता. तसेच नजीकच्या मित्रांना, नातेवाईकांना व्यवसायाबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता. अजून ओळखींमध्ये व्यवसायाबद्दल लोकांना सांगून ठेवू शकता.
तसेच नजीकच्या समारंभ कार्यालयामध्ये जाऊन तिथे जर काही समारंभ असतील तर त्यासाठी तेथील मालकाला किंवा पोस्टर लावून व्यवसायाचा प्रसार करू शकता.
कंपन्यांमध्ये सुद्धा जाऊन किंवा ऍडमिन पर्सन ला भेटून व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. हि ऑफलाईन पद्धतीने करता येणारी मार्केटिंग आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा व्यवसायासाठी मार्केटिंग करू शकता.ऑनलाईन मार्केटिंग मध्ये व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम,किंवा इतर नजीकच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये व्यवसायासंबंधी माहिती देऊ शकता.
ऑनलाईन स्वतःचे पेज तयार करून आणि ग्रुप तयार करून व्यवसायासंबंधी माहिती इतर लोकांना देखील देऊ शकता अशा रीतीने व्यवसायाची मार्केटिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने देऊ शकता.
अशा प्रकारे फुलांचा किंवा फुलांच्या डेकोरेशन चा व्यवसाय घरी बसून करू शकता आणि या व्यवसायासाठी कमी भांडवलामध्ये चालू करून नफा वाढवू शकता.ऑर्डर्स जसजशा वाढत जातील त्याप्रमाणे व्यवसाय अजून वाढवून त्यामध्ये अजून काही नवीन कल्पना करून आणि चांगल्या मोठ्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रयत्न करून हा व्यवसाय अजून द्विगुणित करू शकता सुरुवातीला या व्यवसायासाठी परिश्रम असले तरीसुद्धा भरपूर प्रॉफिट मिळू शकते.
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
very excellent information...khup chhan
उत्तर द्याहटवा