चपाती/पोळी/भाकरी बनवणे | Chapati or Roti Making

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!


आज या भागात  चपाती/पोळी/भाकरी बनवण्याचा  व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.

चपाती/पोळी/भाकरी बनवण्याचा व्यवसाय | 



बऱ्याच शहरामध्ये किंवा गावी शिकण्यासाठी/नोकरी करण्यासाठी बाहेर गावावरून मुले मुली येऊन हॉस्टेलमध्ये किंवा रूम रेन्टने घेऊन राहायला येतात.खाण्यासाठी किंवा जेवणाची सोय चांगल्या मेसमध्ये करतात नाहीतर काही ठिकाणावरून भाजी विकत येतात आणि चपाती/भाकरी विकत घेतात. काहीजण भाजी स्वतः बनवतात आणि चपात्या विकत घेतात.

चपाती/पोळी/भाकरी बनवण्याचा व्यवसाय  गरज:-

काही ठिकाणी मेसमध्ये चपाती/भाकरी देण्यासाठी बाहेरून चपात्या विकत घेतल्या असतात.जर हॉटेल किंवा खानावळ मोठ्या प्रमाणात चालत असेल तर ते चपात्या/भाकरी बाहेरून विकत घेऊन मेसमध्ये विकण्यासाठी ठेवतात. त्यामुळे चपाती/भाकरी बनवण्याचा व्यवसाय घरगुती करून बरेच जण  भरपूर कमावताना दिसतात.


जिथे जिथे नवीन कॉलेजेस किंवा एज्यूकेशनल इन्स्टिटयूट उभारल्या  आहेत तिथे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थीना राहण्यासाठी होस्टेल्स किंवा वसतिगृह उभारले जातात आणि तिथे खाण्याची सोय म्हणून बाहेरून मेसमधून चपाती आणि भाजी विकत घेतली जाते. हे लक्षात घेऊन फक्त चपाती/भाकरी बनवण्याचा व्यवसाय चालू केला तरी यातून भरपूर नफा मिळवू शकता.

त्यासाठी  मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात देखील हा व्यवसाय चालू करू शकता. काहीजण घरगुती चपात्या/भाकरी विकत घेतात तर काहीजण चपात्या बनवण्यासाठी मशीनवर चपात्या बनवून व्यवसाय करतात.

कुठल्याही प्रकारे हा व्यवसाय करू शकता.मशीनद्वारे चपातीचे गुणवत्ता किंवा तेवढ्या चांगल्या चपात्या बनल्या जात नाहीत.जर हाताखाली चपाती बनवण्यासाठी महिलाना ठेवले तर  चांगल्या प्रतीच्या चपात्या बनवून मुलांना खायला किंवा मेसमध्ये देऊ शकता.

तसेच बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यादेखील उभारल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कंपनीमध्ये कामानिमित्त जे लोक बाहेर गावावरून कामगार येतात ते कंपनीजवळ एखादी भाड्याने जागा बघून तिथेच राहतात आणि बाहेरून मेसमधून जेवण विकत घेतात. कधीकधी काही कंपन्यादेखील कामगारांसाठी जेवणाची सोय करतात तिथेदेखील  चपात्या मोठ्या प्रमाणात विकत देऊन व्यवसाय चालू करू शकता.     

व्यवसाय चालू करण्यासाठी जागेची गरज  |

चपाती/भाकरी बनवणे हा व्यवसाय असा आहे कि  व्यवसायासाठी  घरच्या घरी  किचनमध्येच  चालू करू शकता. त्यामुळे  वेगळी जागा घेण्याची गरज भासत नाही. 


जर मशीन घेऊन हा व्यवसाय चालू करणार असाल तर मात्र  जागेची गरज लागू शकते. त्यासाठी भाडेतत्वावर छोटीशी जागा घेऊन तिथे चपाती बनवण्याचा व्यवसाय चालू करू शकता. तसेच दुकाना शेजारी किंवा कंपनी कॉलेज शेजारी एखादी छोटीशी जागा घेऊन देखील हा व्यवसाय चालू करू शकता. जर बजेट आहे तर जागा विकत घेऊन देखील हा व्यवसाय चालू करू शकता. सुरुवातीला जरी घेऊन हा व्यवसाय चालू केला तरी तो चालू शकतो.

 व्यवसायामध्ये नफा

चपाती/पोळी/भाकरी हा व्यवसाय अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चालण्यासारखा व्यवसाय आहे. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मशीन लावून चपात्या मोठ्या कंपन्या, हॉस्पिटल,होस्टेल्स, कॉलेजेस मध्ये पुरवले जातात त्यामुळे हा व्यवसाय बारा महिने चालण्यासारखा व्यवसाय आहे. चपाती/भाकरी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.खाण्यात  दररोज वापरली जाते त्यामुळे चपाती/भाकरी ला खूप मागणी आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी आश्रम आणि शाळा असतात तिथे देखील चपात्यांची आवश्यकता असते. त्यामुळे  तिथेदेखील ह्या चपात्या/भाकरी विकून चांगला नफा मिळवू शकता.   


हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटसाठी चांगल्या जेवणाची आवश्यकता असतेच. जरी चपाती/भाकरी हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनमध्ये देखील विकत देऊ शकता.

मार्केटिंग 

मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचे बॅनर वापरू शकता किंवा पोस्टर जवळच्या ठिकाणी लावून व्यवसायाबद्दल इतर लोकांना माहिती देऊ शकता. मोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन व्यवसायाबद्दल जर माहिती दिली आणि सॅम्पल जर दिले तर कंपन्यांमध्ये चपाती देऊन देखील भरपूर नफा मिळवू शकता.  

 खर्च

चपाती किंवा भाकरी तयार करण्याचा व्यवसाय सहजरित्या कमी खर्चामध्ये चालू करून चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय  घरूनदेखील करू शकता ज्यामुळे जागेसाठी जो लागणारा खर्च आहे तो वाचतो. अगदी कमी खर्चामध्ये कुणीही हा व्यवसाय सहजरित्या चालू करू शकतो. 

ट्रेनिंग

 वेगळे काही ट्रेनिंग वगैरे घ्यायची गरज लागत नाही. त्यामुळे हा व्यवसाय कुणालाही कार्य येऊ शकतो फक्त काम करण्याची तयारी पाहिजे आणि त्यासाठी थोडेफार मार्केटिंग करणे हि आवश्यक आहे. शिवाय जिथे चपाती लागते तिथे जाऊन  व्यवसायाची माहिती आणि  चपात्या खाण्यासाठी सॅम्पल म्हणून दिल्या तर त्याचा ऑर्डर्स  सहज मिळवू शकता. त्यामुळे या व्यवसायापासून  चांगला नफा मिळू शकतो.

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...