वेफर्स/चिप्स बनवणे भाग २ | Waffers Making

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज या भागात चिप्स/वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.


वेफर्स/चिप्स साठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन:-


शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन सुरुवातीला करावे लागेल

त्यानंतर जी. एस. टी. रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते 


ट्रेडमार्क 


जर स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करून त्याद्वारे वेफर्स विकायचे असतील तर ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन करावे लागेल


फूड लायसेन्स


फूड लायसन्ससाठी एफ.एस.एस.ए.आय. आणि एफ.डी.ए. लायसन्स लागतील 

याशिवाय अजून काही इतर माहिती हवी असल्यास नजीकच्या सरकारी कार्यालयात जाऊन घेऊ शकता.


वेफर्स/चिप्स साठी प्रशिक्षण किंवा प्रोसेस  

वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी कोणत्याही ट्रैनिंगची गरज लागत नाही.घरीच वेफर्स/चिप्स बनवायला शिकु शकता.घरी सुरुवातीला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी सुद्धा चांगला हात बसण्यासाठी थोडे दिवस वेफर्स/चिप्स घरीच वेफर्स/चिप्स बनवू शकता

जर बनवता येत नसतील किंवा वेफर्स/चिप्स बनवणार नसाल तर वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी कोणीतरी चांगला मदतनीस घेऊ शकता. बरेच ठिकाणी असे कारागीर मिळून जातील. त्यांच्या मदतीने व्यवसायामध्ये चांगला जम बसवू शकता. 


मोठी वेफर्स/चिप्सची कंपनी उभारणार असाल तर त्यासाठी आवश्यक गोष्टी :-

वेफर्स/चिप्सची जर मोठी कंपनी उभारण्याचा विचार करत असाल आणि तसे बजेट असेल तर त्यासाठी मोठे प्रोडक्शन हाऊस उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेफर्स/चिप्स तयार करण्यासाठी मशिन्स विकत घ्याव्या लागतील


तसेच पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या मशीन विकत घ्याव्या लागतील. वेफर्स/चिप्स साठी चांगला प्लॅन तयार करावा लागेल. कंपनीसाठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन, मटेरियल, मशिन्स, कामगार, स्टाफ, पॅकेजिंग, मालासाठी गोडाउन, मार्केटिंग टीम, लागणारा खर्च, इन्व्हेस्टमेंट ह्या सर्व बऱ्याच गोष्टींचे व्यवस्थितरीत्या प्लॅनिंग करून मगच पुढचे नियोजन करू शकता


वेफर्स/चिप्स पॅकेजिंग । wafers or chips packaging

वेफर्स/चिप्स साठी सुरुवातीला पॅकेजिंगसाठी पेपरबॅग्सचा वापर करू शकता. जर प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर नंतर कोणत्याही पॅकेजिंग कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथून पॅकेजिंग करून घेऊ शकता.


त्यासाठी त्यांना जो पॅकेजिंगचा खर्च येईल तो त्यांना द्यावा लागेल. घरीसुद्धा पॅकेजिंग करू शकता. त्यासाठी छोटीशी एक मशीन खरेदी करावी लागेल.मालाचे वजन करण्यासाठी एक मशीन विकत घ्यावी लागेल.

दुकानदारांना विकण्यासाठी जर माल देणार असाल तर मोठ्या corrugated बॉक्समध्ये सर्व पॅक्स पॅक करू शकता


पॅकेजिंगसाठी कुणीतरी ठेवू शकता आणि ऑर्डर घेण्यासाठी कुणीतरी एकजण ठेवू शकता. अशा प्रकारे कोणत्या कामासाठी मदत हवी आहे त्याप्रमाणे स्टाफ किंवा मदतनीस ठेवू शकता.


वेफर्स/चिप्स ची किंमत । price for wafers or chips

वेफर्स/चिप्स साठी मालासाठी लागणारा खर्च आणि त्यातून किती नफा मिळवायचा आहे त्याप्रमाणे मालाची किंमत ठरवू शकता. इतर ठिकाणी किती किंमत अशी कशी ठरवत आहेत ह्याची पडताळणी करून मटेरीयल ची किंमत ठरवू शकता. वजनाप्रमाणे पॅकिंग करून त्याप्रमाणे त्यामध्ये नफा अधिक करून मालाची किंमत ठरवू शकता

काही जण १० रुपये किंवा २० रुपये ह्याप्रमाणे पॅक्स बनवून विकतात त्याप्रमाणे मटेरियल किंवा पॅक्स बनवून त्याप्रमाणे किंमत ठरवू शकता


वेफर्स/चिप्स साठी स्टाफ किंवा लागणारे मदतनीस । required staff for wafers or chips

वेफर्स/चिप्स साठी जर जास्त प्रमाणात मागणी असेल आणि ते काम जर एकट्याला जास्त होत असेल तर त्यासाठी तुमच्या हाताखाली मदतनीस ठेवू शकता. वेफर्स/चिप्स बनवण्यासाठी एक मदतनीस ठेवू शकता



मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...