नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!
आज या भागात हस्तकला एक चांगली व्यवसायची संधी या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.
हस्तकला म्हणजे हात किंवा / व साधी हत्यारे/उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत.हा कले चा पारंपारिक भाग आहे.यात कातणे,विणणे, सुईकाम, जरीकाम,शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम,नक्षीकाम ,सुतारकाम कुंभारकाम अश्या सारख्या कामांचा समावेश होतो.भारत यासाठी प्रसिद्ध आहे.
हॅन्डबॅग्स
सध्या विविध प्रकारच्या हॅन्डबॅग्स बाजारात उपलब्ध असतात. आणि मुलींना तर नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग्स हव्या असतात.
जर विविध प्रकारच्या हॅन्डबॅग्स बनवत असाल तर यात भरपूर स्कोप आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये हॅन्डबॅग्स तयार करून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या पद्धतीने उद्योग वाढवू शकता आणि भक्कम कमाई करू शकता.
quilling आर्ट
जर विविध प्रकारच्या quilling आर्ट मध्ये आवड असेल तर विविध प्रकारचे पैंटिंग्स, फूल, वेगवेगळ्या प्रकारच्या कानातील रिंग्स, अंगठी, ब्रेसलेट्स, राखी वगैरे बनवून त्या विकू शकता.
कॅन्डल
वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल तयार करता येत असतील तर यात प्रचंड मोठी मागणी आहे. बर्थडे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर्समध्ये कॅण्डलची खूप मागणी असते.
सेंटेड कॅण्डल, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन वापरून तयार केलेल्या कलरफुल कॅन्डल तयार करून प्रचंड कमाई करू शकता.
फुलदाणी
जर घरी फुलदाणी तयार करत असाल तर हा सुद्धा खूप लोकप्रिय व्यवसाय आहे. आजकाल बरेचसे लोक आपल्या घरात डेकोरेशन साठी याचा म्हणून उपयोग करतात.
प्रत्येक घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही पहिले असेल एकतारी फुलदाणी असतेच. जर तुम्ही चांगल्या डिझाईन करून वेगवेगळ्या साईझ मध्ये फुलदाणी तयार केल्या तर त्यामध्ये सुद्धा खूप प्रॉफिट मिळवू शकता.
गिफ्टस
आपल्याकडे सणासुदीला किंवा कुणाच्या बर्थडे पार्टीला आपण काहींना काही गिफ्ट देत असतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि नेमके गिफ्ट काय द्यायचे तुम्ही जर विविध प्रकारच्या गिफ्ट्स तयार करत असाल तर तुम्ही त्या वस्तू सेल करू शकता.
ग्रीटिंग्स कार्ड्स तयार करणे. छोटेछोटे फुलदाणी बनवणे, छोट्या मुलासाठी टेडीझ तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये चॉकलेट्स तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे बॉक्सेस तयार करणे, फोटो अल्बम तयार करणे. अशा अनेक प्रकारच्या विविध वस्तू तयार करून त्या विक्रीसाठी ठेवू शकता.
हस्तकला ऑनलाईन कशा विकाल | best way to sell crafts online.
ऑनलाईनसाठी बरेच ऑपशन्स available आहेत. बऱ्याचशा वेबसाइट्सनी ऑनलाईन सेल करण्यासाठी हस्तकलेलासुद्धा तेवढेच महत्व दिले जाते.
*सर्वात अग्रेसर हस्तकलेला विकण्यासाठी वेबसाइट्स पुढीलप्रमाणे आहेत.
१. etsy – हा फ्री प्लॅटफॉर्म नाही पण हस्तकलेसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला इथे तुमच्या प्रॉडक्ट्स लिस्टिंगसाठी फी द्यावी लागते.
२. Amazon – हा एक चांगला फ्री प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून तुमचे प्रॉडक्ट्स ऍड करू शकता. तुमचा प्रॉडक्ट विकला गेल्यावर तुम्हाला काही रक्कम कमिशन म्हणून amazon ला द्यावे लागते.
३. Ebay – Ebay वर हस्तनिर्मित वस्तू सर्वोत्तम विकल्या जातात. त्यामध्ये जुन्या हस्तकला, मेणबत्ती,मेटलवर्किंग ,लाकूडकाम, काचेच्या कला, ओरिगामी, बास्केट, अशा वस्तू जास्त विकल्या जातात.
विक्री करण्यासाठी व्यवसायाचा परवाना आवश्यक आहे का?
कुठलाही उद्योग कारण्यास व्यवसाय परवाना असणे आवश्यक आहे.
Etsy किंवा Shopify सारखे प्लॅटफॉर्म हे तपासत नाहीत की त्यांच्या साइटचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यवसायाकडे असे करण्यासाठी योग्य परवाने, परवानग्या, नोंदणी इत्यादी आहेत.
उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व licenses असणे अत्यंत गरजेचे आहे.
हस्तकला विकण्यासाठी टॅक्स आयडीची आवश्यकता आहे का?
जर तुम्ही सुरुवातीला एक छंद म्हणून काही करत असाल तर त्यासाठी नाही. पण जर त्याचे व्यवसायात रुपांतर करणार असाल आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मग टॅक्स आयडीची आवश्यकता आहे.
जेव्हा तुम्ही विशिष्ट रकमेपेक्षा जास्त कमवाल त्यावेळी तुम्हाला Gst रेजिस्ट्रेशन किंवा शॉप ऍक्ट किंवा टॅक्स आयडी वगैरे लागू शकते. कुणी माहितीमधील CA च्या मदतीने करून घेऊ शकता.
थोडक्यात हस्तकलेच्या माध्यमातून किंवा वापर करून एका यशस्वी उद्योगाची घरीबसल्या सुरुवात करता येते. हळूहळू त्याचा प्रसार ऑनलाईन च्या मदतीने करून तुमचा उद्योग उभा करा.
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा