पापड बनवणे भाग १ | Papad Making.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज या भागात पापड तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.


घरोघरी गावी पापड बनवले जातात आणि ते वर्षभरासाठी खाण्यासाठी वापरले जातात. जर अशी पापड बनवण्याची कला असेल आणि आवड असेल तर वेवेगळ्या प्रकारचे पापड बनवून  एक घरी बसल्या व्यवसाय चालू कर शकता

काही गृहिणी पापड बनवण्यामध्ये अत्यंत निपुण असतात. त्यांना हा उद्योग चांगला फायदा देऊ शकतो. जर घरी बऱ्याच प्रकारचे पापड बनवत असाल तर ते विकून देखील चांगले पैसे कमवू शक

आपल्या घरामध्ये प्रत्येक जण उन्हाळा आला म्हंटले कि वर्षभरासाठी चांगले रुचकर पदार्थ बनवण्यासाठी तयारी केली जाते.

 वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी पदार्थ आपण वर्षभर खाण्यासाठी वापरतो. त्यासाठी मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, वेगवेगळ्या प्रकारचे भाजी बनवण्यासाठी सांडगे,वेगवेगळ्या प्रकारच्या पिठापासून डाळीपासून पापड तयार केले जाता

 जर असेच पापड बनवून ते  बाजारामध्ये विकले तर  एक चांगला नफा मिळवू शकाल.कोणत्याही प्रकारचे पापड बनवू शकता. जर अशी पापड बनवण्याची कला किंवा आवड असेल आणि घरी ते बनवत असाल तर पापड बनवून चांगले पैसे मिळू शकतात. घरीबसल्या  हे काम करू शकता. त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज लागणार नाही

पापड हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. मुख्यत्वेकरून हे पापड उन्हाळ्यामध्ये तयार केले जाता

काही पापड कधीही तयार करू शकतो.

 उदा:- मध्ये उडदाचे पापड  कधीही तयार करू शकता. तसेच आजकाल असे काही नाही कि उन्हाळ्यामधेच ऊन असते. बऱ्याच वेळा ऊन असतेच त्यामुळे त्याप्रमाणे पापड तयार करू शकता. उडदाचे पापड उन्हामध्ये वाळवायचे नसतात त्यामुळे  ते कधीही तयार करू शक

त्यासाठी  कोणकोणते पापड बनवू शकता त्या पापडाचे सर्व साहित्य घरी आणून  भरपूर पापड तयार करू शकता

हीच  आवड  चांगल्या प्रकारचा उद्योग म्हणून  उपयोगी पडू शकता.लगेचच सर्व गोष्टीची तयारी करून पापड बनवून त्याचे वेगवेगळे पॅकेट्स तयार करून शेजोपाजारी सुद्धा देखील  ते विकू शकता.

पापड बनवण्यासाठी कोणता एक प्रकारचा पापड जरी विकायला सुरुवात केली तरी चालू शकते. सुरुवातीला कोणता जो  सोप्या आणि सहज पद्धतीने तयार करता येईल अशा पापडाचे निवड करून त्या पापडाचे किलोप्रमाणे पॅक करून ते बाजारात विकायला देऊ शकता. 

स्वतः घरून ते विकू शकता. बऱ्याच प्रकारचे पापडाचे प्रकार हे तयार केले जातात. महाराष्ट्रात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार केले जातात. त्यामुळे  ह्यांच्यामध्ये भरपूर काही प्रकार किंवा मोजकेच काही प्रकारचे पापड बनवून  व्यवसाय चालू करू शकता.

  • साबुदाण्याचे पापड
  • तांदळाचे पापड
  • गव्हाच्या कुरवड्या
  • नाचणीचे पापड,
  • उडदाचे पापड. 

असे अनेक प्रकारचे पापड आपण तयार करू शकतो. यातून सुरुवात करू शकता.

सगळ्यात सोपे पापड हे साबुदाण्याचे पापड आणि उडदाचे पापड आहेत. काही इतर पापड जरी घरी बनवत नसाल तरी  हे दोन्ही पापड तर नक्कीच घरी बनवत असाल.हेच पापड विकून  चांगला व्यवसाय उभारू शकता

समजा जर  सुरुवात साबुदाण्याच्या पापडांपासून केली तर  कोणकोणत्या गोष्टी लागतील ते आपण पाहू

हे पापड तयार करण्यासाठी सर्वप्रथम  साबुदाणा आणावा लागेल. सर्वांच्या घरी सहजपणे साबुदाणा उपलब्ध असतो.

मग  उन्हाळा चालू झाला कि लगेचच साबुदाण्यापासून पापड तयार करू शकता. यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे पापड तयार केले जातात.


  • साबुदाण्याचे शिजवून केलेले पापड
  • उकडून केले गेलेले पापड
  • साबुदाण्याच्या चकल्या 
  •  सांडगे

असे वेगवेगळ्या प्रकारे साबुदाण्यापासून पापड तयार करून  ह्यामध्येच चांगले पारंगत होऊ शकता.

पापड तयार करण्यासाठी  सर्व साहित्य एकत्र करून पापड तयार करण्यासाठी काही चांगल्या महिला कडून किंवा घरातील माहितगार व्यक्ती कडून शिकून घेऊ शकतं.तसेच सुरुवातीला थोड्या कमी प्रमाणात हे पापड तयार करून ते sample साठी देऊ शकता.

जसजसे  पापड तयार करण्यात पारंगत व्हाल तसे  नंतर प्रमाण वाढवून जास्त प्रमाणात पापड तयार करता येईल हे पाहू शकता

नंतर हे पापड चांगल्या रीतीने व्यवस्थित पॅकिंग करून विकण्यासाठी ठेवू शकता. सुरुवातीला  छोटे छोटे पॅक तयार करून ते विकण्यासाठी ठेवू शकता.हळूहळू जसे पापड विकले जातील तसे १ किलो किंवा २ किलो चे पॅकिंग करून  ते विकू शकता.यासाठी जास्त काही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही.

साबूदाना पापड कृती:- (शिजवून) 


  • जर शिजवून पापड बनवणार असाल तर हे अत्यंत सोप्या रीतीने बनले जातात.
  • फक्त मीठ आणि गरम पाणी उकळवून त्यामध्ये रात्रभर भिजवलेला साबुदाणा टाकून तो शिजून द्यायचा.
  •  एका पातेल्यात गरम पाणी आणि साबुदाणा झाकून ठेवायचा थोड्या वेळात बघाल साबुदाणा पाण्यामध्ये शिजला आहे
  •  हे मिश्रण लगेचच उन्हामध्ये एक पातळ कागदावर एका खोलगट पळीच्या साहाय्याने गोल गोल आकारामध्ये  हे छोटे छोटे पापड सोडू शकता.
  • दिवसभर चांगल्या उन्हामध्ये हे वाळवून घेऊन परत दुसऱ्या दिवशी ते उलटून  परत सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवून द्यावेत. 
  • आवडीप्रमाणे  जसा मसाला हवा असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचा वापर करून फ्लेव्हरप्रमाणे पापड तयार करू शकता

 उडीद पापड

साबुदाण्याचे पापड बनवायला कसे सोपे आहेत हे पहिले तसेच उडदाचे पापड बनवणे देखील अत्यंत सोपे आहे ह्यासाठी देखील  जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. 

उडीद पापड कृती:-


  • आजकाल बाजारामध्ये उडदाचे पापड तयार करण्यासाठी तयार पीठ उपलब्ध आहेत. त्यामुळे पापड तयार करणे  अगदी सोपे जाते.
  • फक्त हे पीठ विकत आणून ते मळून घेऊन त्यापासून पापड लाटू शकता. 
  • पापड लाटण्यासाठी  पापडाचे लाटणे आणि पोळपाट लागे
  • पापड वाळवण्यासाठी मोठ्या कागदावर  पापड ठेवून नंतर थोडे सुकल्यानंतर लगेच एकावर एक ठेवून त्यावर काहीतरी जाड वस्तू ठेवून तसेच ठेवू शकता. म्हणजे हे पापड सरळ राहतात.
  • हे पापड  कधीही तयार करू शकता. ह्यासाठी  उन्हाची किंवा उन्हाळ्याची वाट बघावी लागत नाही. कोणत्याही सीझनमध्ये हे पापड तयार करून विकू शकता. 

सुरुवातीला पापडासाठी लागणारे पीठ तयार करण्याची गरज नाही ते तयार विकत आणू शकता. नंतर मग जसा तुमचा हात बसेल आणि अंदाज येईल तसे मग नंतर हे पापडाचे पीठ घरच्या घरी तयार करू शकता. त्यासाठी पीठ तयार करण्यासाठी  रेसिपी किंवा दुसऱ्या कुणाची तरी मदत घेऊन हे पीठ तयार करायला शिकू शकता.

अशा प्रकारे  सहज आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनवू शकता. ३ ते ४ दिवसामध्ये कडक उन्हामध्ये चांगले वाळल्यानंतर ते काढून घ्यावे. जसे पॅकिंग करून विकायचे आहे त्याप्रमाणे ते पॅक तयार करून विकू शकता.


काही जण ऑर्डरप्रमाणे देखील हे पापड तयार करतात आणि विकतात  देखील तसे सुद्धा करू शकता. अगोदरच पापड टेस्टला देऊन त्याप्रमाणे कुणाला पापड हवे असतील तर  ऑर्डर करून घेऊ शकता.पॅकेजिंगचे काम करण्यासाठी तयार असेल तर  त्याला पॅकेजिंगचा खर्च देऊन त्याप्रमाणे पापड पॅक करून घेऊ शकता.

पापड व्यवसायात गुंतवणक:-

पापडच्या व्यवसायात 10 हजार ते 10 लाख गुंतवले जाऊ शकतात.आपण किती खर्च करू इच्छिता हे आपल्यावर अवलंबून आहे. बहुतेक लोक सुमारे 1 लाखांपासून आपला व्यवसाय सुरू करतात. पापडचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, किती खर्च येईल याचे सखोल संशोधन करा.

पापड व्यवसायातून मिळणारा पैसा:-

पापडच्या व्यवसायाचे उत्पन्न त्याच्या खर्चावर अवलंबून असते, जर खर्च जास्त असेल तर कमाई देखील जास्त होईल. हे आवश्यक नाही की कमाई कमी खर्चात कमी असावी, जर  मार्केटिंग चांगले असेल आणि पापडची गुणवत्ता चांगली असेल तर त्याची मागणी जास्त असेल आणि  जास्त कमावू शकता. अंदाजानुसार, सुमारे 20 टक्के गुंतवणूक मिळू शकते. म्हणजेच 1 लाख गुंतवून  दरमहा सुमारे 20 ते 30 हजार कमवू शकता.


उर्वरित पुढील भागात पाहू... धन्यवाद!!

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...