नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!
आज या भागात पापड तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.
सुरुवातीला पापड व्यवसायासाठी जास्त काही इन्व्हेस्ट किंवा खर्च करण्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे पापड विकण्याचा व्यवसाय घरी बसून कमीत कमी खर्चामध्ये चालू करू शकता.
पापड व्यवसायासाठी मार्केटिंग
मार्केटिंगसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे मार्केटिंग करू शकता. नजीकच्या लोकांना किंवा मित्र आणि नातेवाईकांना व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता
त्यानंतर व्यवसाय ऑनलाईन सुद्धा ऍमेझॉन, फ्लिपकार्ट ह्यासारख्या वेबसाईटवर रजिस्टर करून घेऊ शकता. तसेच व्यवसायाची माहिती व्हाट्सअँप द्वारे देऊ शकता
फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर देखील व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता. अशा अनेक प्रकारे व्यवसायाची मार्केटिंग करून तुम्ही व्यवसाय द्विगुणित करून चांगला नफा कमवू शक
अशा प्रकारे पापडाचा व्यवसाय चांगल्या रीतीने घरीबसल्या चालू करू शकता. त्यासाठी खालील काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन पापड व्यवसाय चांगल्या रीतीने चालू करून एक चांगला घरी बसल्या व्यवसाय चालू करू शकता
१. सर्वप्रथम कोणते पापड बनवायचे आहेत ते ठरवून घेणे आवश्यक आहे
२. त्यानंतर ते पापड बनवायला येत नसतील तर ते शिकून घेणे आवश्यक आहे
३. शिकून झाल्यानंतर व्यवसाय चालू करण्यासाठी एक स्वतःचा व्यवस्थित प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.
४. प्लॅन तयार केल्यानंतर व्यवसायासाठी लागणारा खर्च लिहून ठेवणे
५. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट नंतर व्यवसाय चालू करून दिवसाप्रमाणे किती पापड तयार कराल ह्याचे एक टार्गेट ठरवून त्याप्रमाणे काम चालू करा.
६. त्यानंतर मालाचे जसा तो तयार होईल तसे त्याचे व्यवस्थित पॅकेजिंग करणे आवश्यक आहे.
७. नंतर तो माल ग्राहकापर्यंत कसा पोहोचवाल त्यासाठी मार्केटिंग प्लॅन तयार करणे आवश्यक आहे
८. ऑफलाईन मार्केटिंग बरोबरच त ऑनलाईन मार्केटिंगद्वारे जास्तीत जास्त कस्टमर कसा मिळवता येईल हे पाहणे देखील आवश्यक आहे.
९. जसा नफा वाढत जाईल तसे त तो नफा व्यवसायात कसा योग्य रीतीने इन्वेस्ट कराल ही देखील अत्यंत आवश्यक स्टेप आहे
अशा रीतीने व्यवस्थित प्लॅन करून पापड बनवण्याचा व्यवसाय चालू करून चांगला नफा मिळवू शकता.
पापड तयार कारण्यासाठी जागा:-
पापड तयार करण्यासाठी घरगुती जागा पुरेशी असते. छोट्या प्रमाणात चालू करणार असाल तर घरच्या घरी हा व्यवसाय चालू करू शकता.पापड सुकवण्यासाठी छोटेसे अंगण किंवा टेरेस पुरेसा आहे. आणि पापड घरातच तयार करू शकता
कोणकोणत्या प्रकारचे पापड तयार करू शकता:-
बऱ्याच प्रकारचे पापड तयार करू शकता. त्यासाठी जे पापड तयार करता येतात ते विकू शकता.
थोडेफार फ्लेव्हर तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवू शकता. पापड तसे बऱ्याच प्रकारचे असतात. आणि त्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार देखील केले जातात. सहज आणि सोपे पडेल असे पापड बनवू शकता. पापडाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.कोणत्याही पापडाचा व्यवसाय करू शकता.
- साबुदाण्याचे पापड
- बटाट्याचे पापड
- उडदाचे पापड
- नाचणीचे पापड
- तांदळाचे पापड
- ज्वारीचे पापड
- पालक पापड
- रवा पापड
- हंडी पापड
- टोमॅटो पापड
अशा अनेक प्रकारचे पापड तयार करून व्यवसाय चालू करू शकता
पापडासाठी लागणारे साहित्य :-
पापडासाठी कोणत्या प्रकारचे पापड बनवणार आहे त्याप्रमाणे ते साहित्य नजीकच्या दुकानातून विकत आणू शकता. तसेच ओळखीच्या दुकानातून सामान कमी किमतीमध्ये आणून त्याचे पापड तयार करू शकता.
ह्यासाठी कुठेही लांब जाण्याची गरज नाही.नजीकच्या होलसेल विक्रेत्याकडून पापडासाठी लागणारे सर्व साहित्य विकत घेऊ शकता.
पापडासाठी लागणारी मशीन :-
पापडासाठी सुरुवातीला कोणत्याही मशीनची गरज लागत नाही. घरच्या घरी हे पापड तयार करू शकता. घरी आणि मदतीला काही लोक ठेवून पापड तयार करू शकता
जर मशीन हवे असेलच तर indiamart.com ह्या वेबसाइट वर जाऊन कमी किमतीमध्ये त्याप्रमाणे मशीन घेऊ शकता. खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून हि मशीन मिळून जाईल.
लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन:-
पापड हा व्यवसाय घरून चालू करू शकता. हा व्यवसाय चालू करण्यासाठी सर्वप्रथम जी.एस.टी. रेजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल जसजसे व्यवसाय चांगल्या रीतीने वाढेल तसे इतर रेजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक असते
जसे कि शॉप ऍक्ट, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन, अशा प्रकारचे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. इतर माहिती नजीकच्या सरकारी कार्यालयातून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन करू शकता.
पापडसाठी लागणारे पॅकेजिंग:-
पापड बनवून ते चांगल्या रीतीने पॅक करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक बॅग्सचा वापर करू शकता. कागदी बॅग्समध्ये देखील पॅकिंग करू शकता. अशा प्रकारे पॅकिंग घरच्या घरी करू शकता
१०० ग्रॅमपासून ते २ किलो, ३ किलो असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅक तयार करू शकता.त्याप्रमाणे किंमत आणि ब्रँडचे लेबल देखील बनवून पॅकेजवर लावून घेऊ शकता
जर मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असतील तर पॅकिंग बाहेरून देखील करून घेऊ शकता. काही कंपन्या पॅकिंगच्या ऑर्डर्स घेतात आणि व्यवसायासाठी पॅकेजिंगचे काम करतात. तिथून सुद्धा पॅकिंग करून घेऊ शकता.
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
Wa wa
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा