कुरकुरे बनवणे | Kurkure Making.

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!


आज या भागात कुरकुरे तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसे कि टोमॅटो कुरकुरे. मसाला कुरकुरे, झिगझॅग अशा बऱ्याच प्रकारच्या नावाने हे कुरकुरे ओळखले जातात. यामध्ये भरपूर प्रकारचे कुरकुरे बनवून ते मार्केटमध्ये विकु शकता.

कुरकुरे बनवण्यासाठी  बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत. त्या विकत घेऊन घरच्या घरी हा व्यवसाय करू शकता. ह्याची भरपूर सर्वत्र मार्केटमध्ये मागणी असल्याकारणाने हा व्यवसाय  चांगल्या पद्धतीने करू शकता आणि  भरघोस नफा देखील मिळवू शकता.

जर  हा व्यवसाय करायचा असेल तर  सर्व माहिती दिली आहे. त्याप्रमाणे  व्यवसाय  चालू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीचे व्यवस्थितरीत्या प्लांनिंग करायला मदत मिळेल जेणेकरून स्वतःचा व्यवसाय उभारू शकाल.

कुरकुरे हे सर्वात जास्त लहान मुलांना खूप आवडतात.  मुलांना बाजारात घेऊन गेलो कि हि मुले जेव्हा दुकांसमोर काही कुर्कुर्याची पाकिट पाहिले की हट्ट करतात जी मुले कॉलेज किंवा शाळेमध्ये असतात. ते सुद्धा बाहेर ब्रेकमध्ये भूक लागली तर कुरकुरे विकत घेऊन खातात.

ऑफिसमध्ये कामे करणारे कर्मचारी, कामगार, स्टाफ देखील कधीकधी भूक लागली कि पर्याय म्हणून चहाबरोबर ब्रेकफास्टसाठी कुरकुरे विकत घेऊन खातात. यातून लक्षात येते कि कुरकुरे साठी लोकांची किती मागणी आहे. कुणी  कधी बाहेर फिरायला गार्डनमध्ये गेले तरी ते खाण्यासाठी कुरकुरे घेतात. अशा प्रकारे प्रत्येक वर्गातील लोकांना कुरकुरे खाण्यासाठी खूप आवडतात.

त्यामुळे हा जर व्यवसाय कुणी केला त्याचे कुरकुरे संपायला वेळ लागणार नाही.हा व्यवसाय जर सुरु करणार असाल तर  लक्षात आले असेल कि ह्यासाठी सध्या किती मागणी आहे. कुरकुरेचा व्यवसाय सहजसोप्या चालू करून भरपूर चांगला नफा घरच्या घरी मिळवू शकता.

कुरकुरे व्यवसाय चालू कारण्यासाठी लागणारी जागा:-

कुरकुरे व्यवसाय  घरच्याघरी सहजरित्या चालू करू शकता. यासाठी जे काही साहित्य आणि वस्तू लागतील त्या  होलसेल मध्ये बाजारामधून घेऊन कुरकुरे बनवू शकता. यासाठी वेगळी जागा बघण्याची गरज नाही.

एखादी छोटीशी लहानशी खोली जरी असेल तरी तिथून हा व्यवसाय करू शकता. 

नवीन फ्लेवरचे कुरकुरे तयार करून नफा कसा मिळवू शकता:- 

आत्तापर्यंत लक्षात आले असेलच कि कुरकुरे यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर किंवा आकारामध्ये वेगवेगळ्या रीतीने बदल करून  कुरकुरे अधिकाधिक खपवू शकता.

बाजारामध्ये याची खूपच चांगली मागणी आहे. सध्या हल्दीराम, बालाजी हे ब्रँड किती प्रसिद्ध आहेत हे  माहीतच आहे. कंपन्या नेहमी त्यांचे  फूड प्रॉडक्ट्स असतात त्यामध्ये काहीतरी नवीन आणून त्याचे नाव बदलून ते मार्केटमध्ये विकत असतात. लोकांना सुद्धा वेगवेगळ्या चवीसाठी असे पदार्थ खाण्यासाठी खूप आवडतात.


आपणसुद्धा असेच थोडे फ्लेवर मध्ये बदल करून नवनवीन चटकदार मसाले वापरून किंवा इतर काही बदल करून  कुरकुरे जास्तीत जास्त मार्केटमध्ये खपवू शकता. नवनवीन कल्पना किंवा पाककलेच्या कौशाल्याद्वारे कुरकुरे अजून वेगळ्या प्रकारे लोकांना कसे देता येतील त्याप्रमाणे विचार करून अधिकाधिक कमाई करू शकता.

कुरकुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि खर्च:-

कुरकुरे बनवण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवरचे पीठ, छोले पीठ, मसाले पावडर, सुखे मसाले, तेल, इत्यादी वस्तू विकत आणाव्या लागतील.सर्व वस्तू होलसेल मार्केटमधून किती कुरकुरे बनवायचे आहेत त्याप्रमाणात विकत घेऊ शकता. 

यासाठी लागणारा खर्च हा  गरजेप्रमाणे किंवा  सुरुवातीला किती गुंतवणुक करू शकता त्याप्रमाणे  ठरवावे. जसे सर्व प्रथम १ किलोसाठी  किती खर्च येईल आणि त्यामध्ये  किती कुरकुरे पॅक बनवू शकाल. त्याप्रमाणे खर्च ठरवू शकता.

सगळ्या वस्तूंचा येणारा खर्च एकत्र लिहून ठेवावा म्हणजे नंतर ज्यावेळी  कुरकुरे साठी नफा मिळवून जी किंमत ठरवावी लागेल ती ठरवायला  सोपे जाईल. सुरुवातीला व्यवस्थितपणे व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टीचे नियोजन करावे लागेल म्हणजे बजेटप्रमाणे  व्यवसाय चालू करता येईल.

  कुरकुरे बनवण्यासाठी लागणारी मशीन आणि खर्च:-

कुरकुरे बनवण्यासाठी जर मशीन विकत घेणार असाल तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मशिन्स उपलब्ध आहेत. त्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकता. जर  बजेटमध्ये बसत असेल आणि आवश्यक असेल तर मशीन विकत घेऊन कुरकुरे बनवू शकता.


जास्त माल कमी वेळेत हवा असेल तशी त्या मशीनची किंमत वाढली जाते. त्याबरोबर ह्यामध्ये GST सुद्धा नंतर ऍड करून त्या मशीनची किंमत ठरते. जर  मशीन घेऊ शकत नसाल तर  घरच्या घरी हॅन्ड मशीनद्वारे कुरकुरे बनवून छोट्या विकू शकता. 


मशिनशिवाय  कच्चे कुरकुरे सुद्धा होलसेल मध्ये विकत घेऊन त्यामध्ये आवडीप्रमाणे फ्लेवर्स टाकून  वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे पॅक करून विकू शकता. यासाठी पॅकेजिंग मशीन घ्यायची सुद्धा गरज नाही.

 साधे कागदी बॅग्समध्ये किंवा चांगल्या ग्रेडच्या बॅग्समध्ये कुरकुरे पॅक करून विकू शकता.जर बजेट पॅकेजिंग मशीन घेण्याइतके आहे तर  त्यासाठी इन्व्हेस्ट करून  स्वतःच्या ब्रॅण्डच्या नावाने कुरकुरे पॅक करून चांगल्या रीतीने नफा मिळवू शकता. त्यामुळे मशीन घेण्यासाठी  कोणताही ज्यास्तीचा खर्च न करता सुद्धा व्यवसाय चालू करू शकता

कुरकुरे व्यवसायासाठी मार्केटिंग :-

मार्केटिंगसाठी  दुकानांमध्ये कुरकुरे पॅक sample देऊ शकता. जसजसे दुकानदाराला कुरकुरेसाठी ग्राहक मिळत जाईल तसतशा ऑर्डर्स वाढत जातील. सुरुवातीला सर्व दुकानांमध्ये मार्केटिंग करणे योग्य ठरते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरसुद्धा व्यवसाय रजिस्टर करू शकता. सोशल मीडियाद्वारे फेसबुक,इंस्टाग्राम, व्हाट्सअँप द्वारे तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

अशा रीतीने  कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. सुरुवातीला  घरच्या घरी कच्चा माल आणून हा व्यवसाय चालू करू शकाल. जसा तो जास्तीत जास्त  नफा मिळवून देईल त्या प्रमाणात व्यवसायात अजून इन्व्हेस्टमेंट करून चांगला वाढवू शकता. 

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

1 टिप्पणी:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...