वेफर्स/चिप्स बनवणे भाग १ | Waffers Making

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!


आज या भागात चिप्स/वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.

वेफर्स छोटा व्यवसाय । Wafers Making


वेफर्स हा एक सध्या अतिशय चांगल्या रीतीने नफा मिळवून देणारा उद्योग आहे. काही नावाजलेल्या वेफर्सच्या कंपन्या चांगल्या रीतीने नफा कमावतात. हा व्यवसाय चालू करण्यासाठी  बऱ्याच गोष्टी घरातच उपलब्ध असतात. बऱ्याचशा घरात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेफर्स आणि बऱ्याच प्रकारचे उन्हाळी पदार्थ बनवण्याची परंपरा असते


वर्षभरासाठी अशा पदार्थांचा साठा करून ठेवतो. जेवणाबरोबर खाण्यासाठी चवीप्रमाणे  वापर करतो. वेफर्स शक्यतो ज्यांचे उपवास असतात त्यावेळी ते खाण्यासाठी वापरले जाता


काही जणांना वेफर्स कधीही भूक लागली की खाल्ले जातात. असे जर  वेफर्स चा व्यवसाय चालू केला तर चांगला नफा मिळवू शकता.


वेफर्स उद्योग चालू करण्यासाठी लागणारी जागा :-

वेफर्स हा उद्योग घरून एखाद्या छोट्या रूममधून सुद्धा  चालू करू शकता. त्यासाठी फक्त वेफर्स तयार करण्यासाठी वेगळी रूम घ्यावी लागेल. स्वतःची रूम असेल तर उत्तमच किंवा  एखादी भाड्याने छोटीशी जागा विकत घेऊ शकता


घरातूनसुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त स्वतंत्र अशी जागा लागेल आणि थोडीशी सुरक्षिततेनुसार काळजी घ्यावी लागेल.मार्केटमध्ये छोटीशी दुकानासमोर किंवा बाजूला अशी रूम घेऊन तिथे वेफर्सचा व्यवसाय चालू करू शकता


वेफर्स/चिप्स मध्ये कोणकोणते प्रकारचे चिप्स करू शकता:-

वेफर्स/चिप्स मध्ये बऱ्याच प्रकारचे चिप्स बनवून ते विकू शकता.

उदाहरणार्थ;

बटाटा चिप्स – बटाट्याचे वेफर्सला सुद्धा खूप मागणी आहे. तुम्ही वेफर्स ताज्या बटाट्यापासून बनवू शकता. बटाट्याचे वेफर्स काहीजण बटाटे वाळवून बनवतात. पण रेगुलर हा व्यवसाय करणार असाल तर ताजे ताजे बटाटे आणून त्यापासून बनवू शकता.

गोड चिवडा

बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी यात बऱ्याच प्रकारचे  व्हरायटी करू शकता. जसे कि छोट्या छोट्या बारीक बटाट्यांच्या तुकड्यांचा  चांगला चिवडा बनवू शकता. बटाट्याचे छोटे छोटे काप करून त्याला मीठ लावून तळून घेऊन त्यामध्ये शेंगदाणे आणि साखर टाकून गोड चिवडा सुद्धा विकु शकता.


तिखट चिवडा

 या बटाट्याचा तिखट चिवडा मिरचीपूड टाकून बनवू शकता. बटाट्याचे गोल काप करून त्यापासूनसुद्धा  तिखट किंवा गोड चिवडा बनवू शकता. अशा प्रकारे  बटाटयाच्या विविध प्रकारचा चिवडा किंवा नुसते वेफर्स बनवून सुद्धा चांगला नफा मिळवू शकता

चिप्स:-

बनाना चिप्स – बनाना चिप्स ला सुद्धा खूप मागणी असते. थोड्याशा कच्चा केळींना वाळवून त्यापासून बनाना चिप्स केले जातात. ताजी कच्ची केळी घेऊन त्यापासूनसुद्धा बनाना चिप्स बनवू शकता. लोकांना ताजे पदार्थ खायला खूप आवडता


बनाना चिप्स मध्ये सुद्धा  तिखट आणि गोड अशा दोन्ही प्रकारचे चिवडे बनवून ते विकू शकता


कारल्याचे चिप्स – कारल्याचे चिप्स सुद्धा  विकू शकता.   


वेफर्स/चिप्स साठी लागणारा कच्चा माल:-

वेफर्स/चिप्स साठी  वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स/चिप्स बनवणार असाल तर त्याप्रमाणे जास्त प्रमाणात मार्केटमधून कमी दरात एकदमच मटेरियल आणणे योग्य ठरते. 

जसे कि बटाटे, कच्ची केळी, कार्ले त्यानंतर मसाल्यामध्ये  तेल,लाल तिखट,शेंगदाणे, साखर आणि मीठ टाकून मिक्स करावे.  


जर अजून बरेचसे मसाले वापरून चिवडे बनवायचे असतील तर  अजून काही मसाले  गरजेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे वापरू शकता. हे सर्व साहित्य होलसेल विक्रत्याकडे मिळून जाईल.

चिप्स बनविताना लागणारे साहित्य

चिप्स किसण्यासाठी एक छोटी किसणी, मोठा झारा आणि मोठी कढई. वेफर्स टाळून झाल्यावर ठेवण्यासाठी मोठी भांडी सुद्धा लागतील. ह्या सर्व गोष्टी विकत आणून किंवा घरी जास्त असतील तर त्या घ्याव्यात. यासर्व साहित्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.स्टाफ किंवा मदतनीस ठेवू शकता


वेफर्स/चिप्स लागणारा प्लॅन आणि खर्च ।  plan and investement for wafers or chips 

कोणताही उद्योग चालू करण्यासाठी अगोदर व्यवस्थित प्लॅनिंगची गरज सर्वप्रथम असते. प्रत्येक उद्योग हा तेव्हाच मोठा होतो ज्यावेळी त्याची व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून त्याप्रमाणे प्रयत्न केले जातात


म्हणून सर्वप्रथम हा व्यवसाय चालू करणार असाल तर त्याची व्यवथित एक योजना तयार करून आणि त्यासाठी लागणारा खर्च बघून त्यामधून नफा कसा वाढवता येईल हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे


म्हणून सर्वप्रथम ह्या सर्व गोष्टी बघणे गरजेचे आहे. ह्यामध्ये  मार्केटिंगसाठी अजून कोणत्या गोष्टी वापराव्या लागतील हे सुद्धा पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते.नंतर पुढचे पाऊल घेऊन व्यवसायाचा प्रारंभ करू शकता.


वेफर्स/चिप्स व्यवसायासाठी मार्केटिंग ।  marketing for wafers or chips

मार्केटिंग अनेक प्रकारे करू शकता.ओळखीने नातेवाईकांना सांगून आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना व्यवसायाची माहिती देऊन व्यवसाय वाढवू शकता


 नजीकच्या किंवा इतर शहरातील दुकानदारांना काही माल  सॅम्पलसाठी विकायला देऊ शकता. अशा रीतीने त्यांना जर  प्रॉडक्ट्स आवडले आणि लोकांनी ते घेतले तर अजून ऑर्डर्स मिळू शकतात. अशा प्रकारे प्रोडक्टस ची लोकांना माहिती देऊन माल विकु शकता

ऑनलाईन पद्धतीने प्रोडक्टसची मार्केटिंग करू शकता. त्यासाठी व्हाट्सअँप वर ग्रुप बनवून लोकांना प्रॉडक्ट शेयर करू शकता. इतर social मीडिया द्वारे देखील  प्रॉडक्ट शेयर करू शकता


अशा प्रकारे  माल बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकता.चांगल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा जसे कि ऍमेझॉन, फ्लिपकार्ट ह्याठिकाणी व्यवसाय रजिस्टर करू शकता. अशा प्रकारे प्रॉडक्ट्स मार्केटिंग करून उद्योग चांगल्या रीतीने चालवू शकता


अशा प्रकारे  जर चांगल्या रीतीने  उद्योग आणि व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर वेफर्स किंवा चिप्स चा नवा व्यवसाय उभारू शकता आणि कमीत कमी खर्चात बजेटप्रमाणे चालू करून अधिकाधिक नफा मिळवू शकता.

पुढील भागात उर्वरित माहिती पाहूया...

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.




1 टिप्पणी:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...