बिस्किट तयार करणे भाग २| Home Made Biscuits

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज आपण या लेखात बिस्कीट व्यवसाय याबद्दल उर्वरित  माहिती घेणार आहोत.




साधारण प्रमाण आणि मजुरी

एक किलो गहू पीठ, अर्धा किलो तूप, अर्धा किलो दूध, अर्धा किलो साखर असे साहित्य दिल्यास त्यापासून दीड ते दोन किलो तयार बिस्किटे मिळतात. सर्वसाधारण ५०/ ७० ते रुपये इतकी मजुरी आकारली जाते. ही मजुरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते.  कोणत्याही सामानाशिवाय बिस्किटांची विक्री १६० रुपये किलो प्रमाणे केली जाते. 

विविध प्रकारची बिस्किटे



कमीत कमी  १८ प्रकारची बिस्किटे घरगुती पद्धतीने बनवता येतात. शुगरफ्री, काजू, कस्टर्ड, नाईस, नानकटाई, कॅडबरी, ओट बनाना, मिल्क इलायची, डार्क चॉकलेट अशा १८ प्रकारची बिस्किटे  तयार करता येतात.गहू, नाचणी शुगर फ्री, काजू, नानकटाई यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. या शिवाय खास उपवासाची बिस्किटे तयार केली जातात. उपवासाच्या बिस्किटांमध्ये राजगिरा व साबुदाणा पिठाचा वापर केला जातो. या बिस्किटांना श्रावणात चांगली मागणी असते.


उत्पादन, पॅकिंग



मागणी जास्त प्रमाणात असेल तर उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी नुकतेच अधिक क्षमतेचे ओव्हन व काही यंत्रे खरेदी करावे लागतील.या सर्व उत्पादनांना उद्योग आधार व आवश्यक ते परवाने घेणे गरजेचे असते. उत्पादनांचा ब्रॅण्ड निर्मिती व पॅकेजिंगवर लक्ष द्यावे.

घरगुती बिस्कीटांचे वैशिष्ठ्ये 

बाजारात मिळणाऱ्या  बिस्किटांमध्ये मैदा असतो, त्याऐवजी आरोग्यदायी अशा गहू, नाचणी, बाजरी अशा पिठांचा वापर. आपण कोणत्याही प्रीझर्वेटिव्हचा वापर करत नाहीत. त्यामुळे ते आरोग्यदायी असतात.


बिस्कीट तयार करणेसाठी लागणारी मशिन्स

साधारण ७०/९० हजार मध्ये बिस्कीट ओव्हन मिळतो. आणि  छोटे पीठ मळणी यंत्र १०/१५हजार पर्यंत उपलब्ध आहेत. इंडिया मार्ट वरती याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.


प्रशिक्षण

व्यवसाय प्रगती करण्यासाठी आवश्यक तिथे प्रशिक्षण घेत आत्मविश्वासाने पुढे जाणे हे श्रेयस्कर ठरेल.बिस्किटे व बेकरी उत्पादनांच्या निर्मितीची विविध प्रशिक्षणे उपलब्ध आहेत.या प्रशिक्षणमधून त्यातील अनेक बारकावे शिकवले जातात. याची फी २,५००/ पासून ५०,०००/  पर्यंत उपलब्ध आहे. कोणत्याही प्रथितयश इन्स्टिट्यूट किंवा कूकींग क्लास मध्ये हे सहज उपलब्ध आहेत.


मिळणारा नफा

साधारणपणे गव्हाची बिस्किटे कमीतकमी प्रतिकिलो १२० रुपये तर वेगवेगळ्या स्वादाच्या बिस्किटांची विक्री प्रतिकिलो १४० रुपये या दराने होते. उपवासाची बिस्किटे प्रतिकिलो २४० रुपये या दराने विकली जातात. सर्व खर्च वजा जाता कमीत कमी तीस टक्क्‍यांपर्यंत या व्यवसायातून नफा राहातो.


व्यवसाय वाढीचा मंत्र

जर  सर्व बाबी लक्ष्यात घेऊन  वरील प्रमाणे व्यवसाय केला तर  घरगुती, उत्तम दर्जाच्या आरोग्यदायी बिस्किटांचा स्वतंत्र ग्राहकवर्ग मिळण्यासाठी मदत होते. "दर कमी,पण क्वॉलिटीची हमी"  या प्रमाणे काम केल्यास निश्चतच यश मिळेल.


मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका

1 टिप्पणी:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...