चॉकलेट बनवणे भाग २ | Chocolate Making

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज या भागात चॉकलेट बनवणे या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे




चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल

बऱ्याच महिलांना घरी काहीतरी नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असते. चॉकलेट सुद्धा अशी वस्तू आहे जी घरी बनवू शकता. घरातील प्रत्येक लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत चॉकलेट आवडत असतात. महिलांना ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स बनवणे खूप आवडते. आणि त्या दरवेळी नवनवीन डिझाईन्स तयार करून हे चॉकलेट्स घरातल्या मुलांना खाऊ घालतात. काही महिला  आपापली हौस किंवा आवड म्हणून चॉकलेट्स तयार करतात. तर काही महिला ह्याबद्दल माहिती घेऊन स्वतःचा घरीबसल्या एक चांगला उद्योग चालू करतात. जर ह्यामध्ये घरून उद्योग चालू करायचा असेल तर सहजरित्या ह्यामधून बरेच काही करू शकता. ह्यांच्यामध्ये  व्यापार वाढवण्यासाठी बराच चांगला स्कोप आहे. 

लागणारी जागा आणि खर्च 

चॉकलेटचा  उद्योग चालू करण्यासाठी जास्त काही खर्च करण्याची किंवा जागेची गरज लागत नाही. फक्त  नवनवीन कला आणि कौशल्याचा वापर करून उद्योग  घरून सुद्धा चांगल्या प्रकारे चालू करू शकता.अत्यंत कमी खर्चामध्ये  बराच नफा मिळू शकतो. कुठेही  जागा किंवा त्यासाठी लागणार खर्च जवळजवळ नसतोच. जर  पुढे मोठी फॅक्टरी किंवा कंपनी उभारायची असेल त्यावेळी  त्यासाठी चांगली जागा आणि खर्च हा करावा लागेल. पण  हा उद्योग अगदी घरूनसुद्धा व्यवस्थितपणे चालू करू शकता. 

चॉकलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आणि प्रॉडक्ट कल्पना

चॉकलेटमध्ये  कल्पना वापरून त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता. पाककलेचा आणि  कलाकौशल्याचा वापर करून  नवीननवीन विविध प्रकारच्या डिझाईन्समध्ये चॉकलेट्स बनवून ते विकू शकता. अगदी आवडीप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे चॉकलेट्स  बनवू शकता. यात ड्रायफ्रुटस चा वापर करून अजून वेगळ्या प्रकारचे चिकलेट्ससुद्धा बनवू शकता. जसे कि almond चॉकलेट, cashew चॉकलेट, मिक्स ड्रायफ्रूट चॉकलेट अशा बऱ्याच प्रकारच्या चॉकलेट्स  विकू शकता. डिझायन्ससाठी बाजारामध्ये बरेच मोल्ड्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये चॉकलेट्स टाकून विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स तयार करू शकता.

चॉकलेटसाठी लागणारे कच्चा माल.


चॉकलेटसाठी लागणारे साहित्य  ऑनलाईन किंवा नजीकच्या होलसेल विक्रेत्याकडून खरेदी करू शकता. आजकाल बऱ्याच ठिकाणी होलसेलमध्ये कच्चा माल बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे. जरी कुणाला चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य द्या म्हंटले तरी लगेच सर्व साहित्य तुम्हाला मिळून जाईल. चॉकलेटसाठी खालीलप्रमाणे साहित्य खरेदी करावे लागेल.

चॉकलेट कंपाऊंड –  चॉकलेट कंपाऊंड ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल.

मेल्टर – चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मेल्टर लागेल. पण जर  घरी तुमच्याकडे असणाऱ्या वस्तू वापरून डबल बॉयलर पद्धतीने  चॉकलेट मेल्ट करू शकता. ह्याची गरज  सुरुवातीला कमी चॉकलेटसाठी लागणार नाही.


मोल्ड्स- विविध प्रकारच्या डिझाईन्स तयार करण्यासाठी  वेगवेगळ्या डिझायनमध्ये मोल्ड्स लागतील ज्याच्या मदतीने  वेगवेगळ्या चोक्लेट्सच्या डिझाईन्स तयार करू शकाल.


मेजरमेंट कप्स आणि स्पून्स – मेजरमेंट करण्यासाठी  कप्स आणि स्पून्स लागतील ते अगदी कमीत कमी किमतीत  मिळून जातील. प्लॅस्टिकमध्ये हे कप्स आणि स्पून्स वेगवेगळ्या मेजरमेंटमध्ये उपलब्ध असतात.  

इसेन्स – वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टप्रमाणे चॉकलेट्स तयार करण्यासाठी वेगवेगळे इसेन्स  लागतील.

कलर –  वेगवेगळ्या कलरचे चॉकलेट तयार करण्यासाठी फूड ग्रेडचे कलर लागतील.

चॉकलेट पॅकेजिंग मटेरियल – चॉकलेट सेट झाल्यावर त्याला पॅकिंग करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य.

रेफ्रिजरेटर – प्रत्येकाच्या घरी रेफ्रिजरेटर हा असतोच त्यासाठी  नवीन काही हि वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. आहे त्या रेफ्रिजरेटरचा वापर करून चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवू शकता.

या व्यतिरिक्त  जर अजून काही वेगवेगळे पदार्थ जसे कि ड्रायफ्रुटस वगरे घालून जर चॉकलेट्स तयार करायचे असतील किंवा अजून काही बनवायचे असेल तर त्याप्रमाणे  साहित्य मागवावे लागेल आणि त्याप्रमाणे  ते साहित्य एका होलसेल विक्रेत्याकडून खरेदी करू शकता.

चॉकलेट उद्योगासाठी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन

चॉकलेट उद्योगासाठी  प्रथम जीएसटी रेजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन, फूड लायसन्स, शॉप ऍक्ट ह्या गोष्टी सर्वप्रथम  लागतील. जर  मोठी कंपनी चालू करायची असेल त्यासाठी त कंपनी लायसन्सची गरज लागेल. अजून काही इतर माहिती  नजीकच्या सरकारी कार्यालयात जाऊन घेऊन सगळ्या गोष्टी रजिस्टर करू शकता.

या व्यवसायाबद्दल अतिरिक्त माहिती पुढील भागात पाहू ... धन्यवाद!!!

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

















  

1 टिप्पणी:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...