मसाले बनवणे भाग २ |Masala Making.

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!


आज या भागात मसाले तयार करण्याचा व्यवसाय या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.


मसाला उद्योग कसा सुरु करावा:- 

 जर हा व्यवसाय अगदी छोट्या स्तरावर म्हणजे ज्याला आपण घरघुती मसाला उद्योग म्हणतो, अशी सुरवात करणार असाल तर त अन्न परवाने (Food licence) काढावे लागणार नाही किंवा त्याची एवढी आवश्यकता भासणार नाही. परंतु जर  हा व्यवसाय मोठ्या स्तरावर म्हणजे मसाले पॅकिंग करून ते हॉटेल, कॅन्टीन, दुकाने, यांना पुरवठा करणार असाल तर काही कायदेशीर आणि इतर काही गोष्टीचा आधी विचार करावा लागेल, ज्याबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली आहे.


1. स्वस्त आणि चांगल्या कच्चा मालाचा शोध घेणे.

सर्वप्रथम  उत्तम दर्जाचा आणि स्वस्त कच्चा मालाचा शोध घेण्याची आवश्यकता लागेल. कारण नफा मिळवायचा असेल तर कच्चा माल हा स्वस्त मिळणं फार गरजेचं आहे.

जर  ग्रामीण भागात हा मसाला व्यवसाय सुरू करणार असाल तर  तिथेच मसाल्याचा कच्चा माल सहज मिळून जाईल. या शिवाय तो स्वस्त देखील मिळेल आणि transportaion चा मुख्य खर्च  वाचून जाईल. जर  शहरी भागात हा मसाला उद्योग करत असाल तर  एखादा उत्तम सप्लायर शोधून कच्चा माल मिळवू शकता.

महत्वाची टिप – Food business मध्ये दीर्घकाळ टिकायचे असेल तर quality फार महत्वाची मानली जाते, नाहीतर एकदा गेलेला ग्राहक कधीही परत येत नसतो. कोणत्याही व्यवसायात कच्चा माल हाच पूर्ण बिजनेस चा केंद्र बिंदू असतो.

म्हणून कच्चा माल हा स्वस्त आणि त्याहून गरजेचे म्हणजे दर्जेदार आहे याची खात्री  केली पाहिजे.


2. मसाला उद्योगासाठी जागा

 घरात जर एखादी मोठी खोली ज्यात मसाले दळण्याचे आणि पॅकिंगचे असे दोघी काम पार पडत असतील तर बाहेर जागा घेण्याची आवश्यकता नाही. जर नसेल तर  एखादा शॉप भाड्याने घ्यावा लागेल.

महत्वाची टिप – शॉप किंवा एखादा रूम भाड्याने घेताना agreement  करून घ्या, कारण पुढच्या कायदेशीर गोष्टीं साठी म्हणजेच अन्न परवाने (Food Licence) साठी ते महत्वाचे असते.


3. मशीन आणि उपकरणे खरेदी

 काही उपकरणे नमूद केली आहेत, ती सर्व या मसाला उद्योगात उपयोगी ठरतील.

हि उपकरणे मागवताना 3 ते 4 सप्लायर्स कडून Quotations मागवा, त्यातून सर्वात स्वस्त dealer कडून उपकरणे खरेदी करावीत.

पुढील machinery आणि उपकरणे त मसाला व्यवसायात उपयोगी ठरतील –

  1. Cleaner – याचे काम कच्या मालातून घाण म्हणजेच धूळ, माती, छोटे खडक बाहेर काढण्याचे असते.
  2. Dryer – कच्चे मसाले दळण्याआधी त्यांना सुखवणे फार गरजेचे असते, आणि ते काम हे ड्रायर करते.
  3. Grinding machine – याचे काम कच्चा माल दळून त्याला पावडर मध्ये रूपांतर करणं असते.
  4. ग्रेडर – याचे काम दळून झालेल्या पावडर ला ग्रेड देण्याचे असते. म्हणजे यात पावडर जाड व बारीक याचे विलगिकरण करण्याचे काम असते. यात बारीक पावडर खाली आणि जाड वरती राहते.
  5. बॅग सिलिंग मशीन – हे उपकरण मसाले वपॅकिंग साठी कामास येते.

 4.कच्चा माल खरेदी करून मसाला व्यवसायाला सुरवात करणे. 

मसाला बनवण्यासाठी दर्जेदार कच्चा माल, व्यवसाय करण्यासाठी जागा याची माहिती घेतली, यानंतर म्हणजे कच्चा माल आयात करुन मसाला दळायला चालू करणे.

कच्चा माल जवळच्या शेतकरी किंवा supplier कडूनच मागवण्याचा प्रयत्न करा कारण तिकडून स्वस्तात मिळेल आणि  बाजारात टिकू शकाल. व्यवसायाचा सर्वात पहिला उद्देश्य नफा कमविणे हाच असतो.

कामगार आणि कच्चा माल जर कमी किमतीत मिळत असेल तर सुरवातीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केट price पेक्षा कमीने  मसाले विकले तर नक्कीच सुरवातीलाच ग्राहक वर्ग चांगला मिळेल.

मसाला व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च :-

  1.  मसाला व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेचा खर्च जो  निवडलेल्या एरियानुसार असेल.
  2. दुसरा खर्च म्हणजे  कच्चा मालाचा जो  निवडलेल्या सप्लायर किंवा शेतकऱ्यावर अवलंबून असेल.
  3. तिसरा खर्च जो अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे मशीन आणि उपकरणे खरेदी साठी लागणार खर्च.

  • Grinding machine For Spices– हे उपकरण अगदी 1 हजारांपासून ते 50 हजारा पर्यंत सुद्धा येते.  कोणत्या स्तरावर व्यवसाय करताय हे त्यावर अवलंबून आहे. 1 हजार ते 2 हजार वाले मशीन हे Manual Operate करावे लागते जे कुटीर मसाला व्यवसाय म्हणजेच घरघुती मसाला व्यवसाय जे करताय त्यांच्यासाठी पुरेसे असेल. आणि जे मोठ्या प्रमाणात मसाला उत्पादन करून मसाले पॅकिंग करून बाहेर supply करत असतील त्यांनी 10 हजारापासून ते 50 हजार पर्यंत असलेले मशीन सर्व गोष्टी तपासून खरेदी करावे.
  • Cleaner For Spices– कच्चे मसाले साफ करण्यासाठी लागणारे हे मशीन ऑनलाईन 10 हजारापासून ते 30 हजारापर्यंत मिळेल.
  • Bag sealing machine – मसाला बॅग पॅक करण्यासाठीचे हे उपकरण तुम्हाला ऑनलाईन 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल.
  • बाकी ग्रेडर, ड्रायर आणि इतर सर्व 20 ते 25 हजार पर्यंत येऊन जाईल. साधारणपणे 1 लाख रुपये इतका खर्च येतो.

मसाला उद्योगासाठी लागणारे परवाने:- 


हा परवाना असेल तर  ग्राहकांना दिलेले खाद्य पदार्थ हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे सिद्ध होते आणि यामुळे कोणालाही काही त्रास झाल्यास  ग्राहकाने तक्रार दाखल केल्यास Food Licence असल्याने कार्यवाही होण्याचे प्रमाण कमी होऊन जाते.

म्हणून मसाला उद्योग सुरू करण्यासाठी  खालील परवाने (Licence) काढणे अनिवार्य असेल –

  • सर्वात आधी  ROC Registration करावे लागेल.
  • जर  छोट्या स्तरावर म्हणजे घरघुती मसाला उद्योग सुरू करणार असाल तर One Person Company registration सुद्धा करू शकतात. 
  • Local Municipal Authority कडून ट्रेड licence सुद्धा काढावे लागेल.
  • Food Operator Licence घेणे सुद्धा आवश्यक असेल.
  • त्या नंतर  BIS सर्टिफिकेट लागेल. 

मसाला व्यवसायासाठी एकूण गुंतवणुक:-

जर घरघुती मसाला उद्योग केलात तर २५ ते ३० हजार प्रमाणावर अगदी दुकान घेऊन केलात तर १ लाखापर्यंत गुंतवणुकीची तयारी ठेवावी लागेल.

मसाला निर्मिती विक्री व्यवसायातून दरमहा मिळणारा:- नफा

खरं तर याच उत्तर तुमच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर आणि प्रमाणावर आहे. तरीही बाजारात मागणी बघता व्यवस्थित quality maintain करून व्यवसाय केला तरसरासरी ७० ते ८० हजार कोणीही कमवू शकेल.

मसाल्यांची मार्केटिंग व विक्री:-

 होलसेल व्यापारी म्हणून व्यवसाय करू शकता. मसाल्याच्या बाजारातील दुकानांशी बोलून उत्पादन होलसेल किंमतीत विकू शकता. तयार  मसाल्यांना शहरातील विविध किराणा दुकानात सहज विकू शकता. मोठ्या कंपन्यांकडून ऑर्डर देखील घेऊ शकता.

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

1 टिप्पणी:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...