नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!
आज आपण एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहे, तो म्हणजे सोप मेकिंग व्यवसाय म्हणजेच साबण मेकिंग व्यवसाय.
हा व्यवसाय पूर्णतः नवीन आहे साबण व्यवसाय बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागते तसेच त्यासाठी भांडवल किती लागेल मार्केटिंग कशी करता येईल याची माहिती घेणार आहे.
आजकाल खेड्यांपासून, लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत साबणाला मागणी आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
दररोज आंघोळीसाठी हात धुण्यासाठी साबणाची गरज लागते तसेच अनेक प्रोडक्शन कंपनीमध्ये हात खराब होतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर साबणाची गरज लागते अशावेळी साबण व्यवसायाकडे पाहू शकतो.
साबण बनवण्याच्या गृह उद्योगात तेल, सार, कॉस्टिक सोडा, पीठ इत्यादी घटकांची आवश्यकता असते. हे साबण मिसळून बाजारात सहज विकता येतात
भारतात साबण मार्केटचे अनेक प्रकार आहेत. साबण मार्केट त्याच्या वापराच्या आधारावर विविध प्रकारांमध्ये विभागला जातो.
उदा., कपडे धुण्याचा साबण, ब्युटी सोप, मेडिकेटेड साबण, किचन सोप, सुगंधी साबण इत्यादी प्रकार आहेत. मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन आपण यापैकी कोणताही प्रकार निवडू शकता.
आजकाल खेड्यांपासून, लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत साबणाला मागणी आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चार लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात साबण तयार करण्याचा कारखाना सुरू करता येतो. याशिवाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून ८० टक्के कर्जही दिले जाते.
मशिनरीजच्या मदतीने बनवलेले साबण बाजारात मिळतात.
काही ठिकाणी हँडमेड साबण बनवण्याचा व्यवसाय देखील तेजीत आहे. या व्यवसायातील सर्वात चांगली बाब म्हणजे छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू शकता.
भारतातील मार्केटमध्ये विविध कॅटेगरींमध्ये साबणाची विक्री केली जाते. मागणीप्रमाणे कोणत्याही एका कॅटेगरीतील उत्पादन सुरू करू शकता.
उर्वरित माहिती पुढील भागात पाहू धन्यवाद!!!!!
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
khup chhan
उत्तर द्याहटवाmast
उत्तर द्याहटवा