योगा क्लासेस |Yoga Clasess

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज या भागात योग क्लासेस व्यवसाय आरोग्य व्यवसाय संधी या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे.


तब्बल पाच हजार वर्ष जुन्या योग याला आंतरराष्ट्रीय मान्यता भारताने मिळवून दिली. दर वर्षी 21 जून रोजी संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या योग शिक्षक म्हणून ट्रेंड चालत आहे. लोक या मध्ये आपले करियर बनवत आहे. 


जर आपण देखील उज्ज्वल भविष्याच्या शोधात असाल तर योगामधील करियर आपल्यासाठी उत्कृष्ट ठरेल. चला जाणून घेऊ या योगा मध्ये काय काम करता येईल.

बॉलिवूड- हॉलीवूडच्या चमचमत्या ताऱ्यांपासून ते उद्योजक, खेळाडूंपर्यंत उच्चभ्रू वर्गातील अनेक मंडळी सध्या फिटनेससाठी योगाची कास धरताना दिसताहेत. अनेक सेलिब्रिटींनी केलेल्या गुणगानामुळे हायफाय सोसायटीतला ‘सो कॉल्ड योगा’ सध्या आणखी चर्चेत आलाय. वेदकाळापासून चालत आलेले हे शास्त्र आता उच्चभ्रू वर्गामुळे ‘हायफाय’ होत चालले आहे.


योगा म्हणून उल्लेख होत असला तरी हा शब्द मुळात ‘योग’ असाच आहे. योग म्हणजे अनुशासन. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींची योगसाधना चालायची ती वेगवेगळ्या कारणांसाठी. सध्या आरोग्यप्राप्तीसाठी योगाकडे पाहिले जाते. धावपळीच्या जीवनात एक प्रभावी उपचारपद्धती म्हणून योग पुढे येतेय. ‘मी योग करतो’ असे कुणी म्हटले, तर सामान्यपणे ती व्यक्ती आसने, प्राणायाम करते असा त्याचा अर्थ होतो. मुळात योगाचे खूप फायदे असल्याने त्याकडे कुणीही आकर्षित होणे स्वाभाविकच आहे.


योग जितका लोकप्रिय होऊ लागलाय, तितके ते शिकविणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासू लागली. पण तेवढ्या प्रमाणात हे तज्ज्ञ उपलब्ध होतातच असे नाही. योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, योग शिकविणाऱ्या तज्ज्ञांची दोन प्रकारात विभागणी करता येऊ शकेल. पहिले म्हणजे, निष्ठेने आणि कसलीही अपेक्षा न ठेवता योगाचा प्रसार करणारी मंडळी. 

दुसरे म्हणजे व्यवसाय म्हणून त्याकडे पाहणारी मंडळी. निष्ठेने योगाचा प्रसार करणारे लोक वर्षानुवर्षे हे काम करीत आहेत. पण जेव्हा त्याकडे व्यवसाय म्हणून किंवा करिअर म्हणून पाहिले जाते, तेव्हा पैसा कमाविण्याच्या उद्देशाने त्यात अनेक गोष्टी येतात.

योग शिकविण्यासाठी आजकाल तज्ज्ञ प्रशिक्षक मिळणे कठीण झाले आहे. अनेक जिम्समध्ये तीन महिन्यांचा बेसिक कोर्स करून सर्टिफिकेट मिळविणारे लोक योग शिकवताना दिसतात. खर तर योगाचे प्रशिक्षक होण्यासाठी किमान ५०० तासांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. कुठले आसन केल्याने काय फायदे होऊ शकतात, हे त्यांना ठाऊक असायला हवे. 



तुम्ही स्वतः जेव्हा त्याचा अनुभव घेता, तेव्हाच ते दुसऱ्यांना शिकवू शकाल ना.’ त्यामुळेच योग शिकायचा असेल तर उत्तम प्रशिक्षक व्हायचे असेल तर उत्तम प्रशिक्षण घेऊन अनुभव घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच यातून पटकन हवे तसे ‘रिझल्टस’ मिळतील, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण नियमितता, आत्मीयता, योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय योगाचे फायदे अनुभवता येणार नाहीत.


* योगातील व्यवसाय वाढतच आहे

आज जगभरातील 1 दशलक्षांहून अधिक योग स्टुडियो आणि तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक योगा प्रशिक्षक, या मधील सुमारे 85 हजार तर केवळ अमेरिकेतच आहे. हे दर्शवितात की योग आता जगभरात एक चांगले जीवन जगण्याच्या कलेचे नाव आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसावर सोशल मीडियाचे जगभरात कौतुक केले जाते. 


आज योगाचा जागतिक व्यवसाय कित्येक अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत बघितले तर योग हा जागतिक निरोगी उद्योगाचा प्रमुख भाग बनला आहे. आजच्या तारखेतच जगातील कदाचित कोणी असे असेल ज्याला योगा बद्दल माहिती नाही.

 

भारतात योग उद्योगाला बघितल्यावर आढळून आले की हे आता 499 अब्ज रुपयांचा उलाढालीवर गेले आहेत. तसेच डिजिटल योगा उद्योगाने देखील तब्बल 100 अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

 आजच्या काळात फक्त तंदुरुस्त राहणे हे इच्छा किंवा फॅशनच्या भाग नाही तर तंदुरुस्त राहणे जीवन शैलीची अनिवार्य स्थिती बनली आहे. आज भले मोठे उद्योगपती, बॉलिवूड आणि हॉलिवूडचे मोठे कलाकार, मोठे व्यापारी आणि राजकारणातील नेते आपल्या तणाव आणि नैराश्याला कमी करण्यासाठी योगाचा अवलंब करतात.  


महत्त्व समजत आहे- 

योग हा लोकांना केवळ शारीरिक दृष्टया निरोगीच ठेवत नाही तर मानसिक दृष्टया देखील निरोगी ठेवतं. आपण व्यायाम किंवा एरोबिक जेवण्यानंतर करू शकतं नाही. पण योगात असे काही आसने आहेत जे अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. योगात अनेक प्रकारची आसने केले जातात. प्रत्येक आसनांचे आपापले महत्त्व आहे. आसन केल्याने आपण निरोगी होऊ शकता, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवू शकता आणि आपल्या शरीराचा बांधा उत्तम प्रकारे राखू शकता.

 

* प्रवेश पात्रता- 

जिथे योगाच्या विशाल उद्योगाचा भाग बनायचं प्रश्न आहे, तर आपण 12 वी उत्तीर्ण केल्यावर देखील या क्षेत्रात पाउले टाकण्यासाठी डिप्लोमा करू शकतात. नंतर सराव सुरू ठेवायचा. आपण इच्छित असल्यास या मध्ये उच्च शिक्षण देखील घेऊ शकता आणि आपली पात्रता वाढवू शकता.

 

* कामाची संधी- 

या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून देखील करू शकता. आपले ग्राहक तयार करा. या कामात घाई करून चालत नाही. आपण आपले ग्राहक ठरवून त्यांचा घरी जाऊन त्यांना योगा करवू शकता. 

 


सहसा या कामाची मागणी शाळेत, रुग्णालयात आणि कार्पोरेट हाउस मध्ये असते. कोणी ही योग शिकवणारी व्यक्ती शाळेत शिक्षक/शिक्षिका म्हणून काम करू शकते. त्याच प्रमाणे, अशे रुग्णालय जिथे सर्व प्रकारचे थेरेपी सेंटर आहेत तेथे आपल्याला इन्स्ट्रक्टर किंवा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळू शकेल.


* उत्पन्न- 

तसं तर योग प्रशिक्षकाला सरकारी आणि खासगी संस्थेमध्ये वैध वेतन दिले जाते, पण आपण ज्यावेळी स्वतंत्र पणे योग प्रशिक्षक म्हणून काम करता तर आपली फीस आधीपासून निश्चित केली जात नाही ती आपण आपल्या ग्राहकाच्या खरेदीच्या सामर्थ्यावर आणि आपल्या क्षेत्राच्या आधारे ठरवू शकता. 

 

* प्रमुख संस्था- 

एमडीएन आयवाय, नवी दिल्ली

संकेत स्थळ - -www.yogamdniy.nic.in

 

बर्कतुल्ला विद्यापीठ, भोपाळ 

संकेत स्थळ - -www.bubhopal.ac.in

 

पीआरएसयू, रायपुर

संकेत स्थळ - www.prsu.ac.in 


कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र 

संकेत स्थळ - www.kuk.ac.in


शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

सावित्री बाई फुले विद्यापीठ, पुणे

YCMOU चे कोर्सेस उपलब्ध आहेत.

IGNOU चे कोर्सेस उपलब्ध आहेत.

कैवल्यधाम,लोणावळा. 

याशिवाय प्रत्येक शहरात अनेक ठिकाणी योगा कोर्सेस चालवले जातात.

मला आशा आहे की योगा क्लासेस हा आजचा विषय चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.जर या विषयावर काही प्रश्न असतील तर त्याबद्दल कमेंट करून माहिती देऊ शकता.


***ही पोस्ट अश्या लोकांपर्यंत पोहचवा ज्यांना या माहिती ची गरज आहे पण त्यांना याबद्दल माहिती नाही***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...