आईसक्रीम विक्री | Ice Cream

 

उन्हाळ्याच्या झळा आता जाणवायला सुरुवात झाली आहे. नागरिक उन्हाळ्यात थंड पदार्थ, आईसक्रीम थंडगार रस, शीतपेय पिण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आईसक्रीमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतातील लोक जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. उन्हाळ्यात आईसक्रीमची मागणीदेखील प्रचंड वाढलेली असते. यामुळं उन्हाळा सुरु होत असताना व्यवसाय सुरु करत असाल तर आईसक्रीम विक्री हा चांगला पर्याय आहे.


भारतीय ग्राहक आता महागडी आईसक्रीम देखील खरेदी करताना पाहायला मिळतात. जर आईसक्रीम व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याविषयी माहिती  देत आहोत.आईसक्रीम व्यवसाय सुरु करताना सुरुवातीला ठिकाण, साहित्य, मनुष्यबळ, मार्केटिंग, परवाने या गोष्टी गरजेच्या आहेत.


ठिकाण


आईसक्रीम शॉप सुरु करायचे असले तर 400 ते 500 स्क्वेअर फुट कार्पेट जागा असणारा दुकान असणं आवश्यक आहे. नसेल तर एकदा ice cream cart सुरू करू शकता. 


दुकानामध्ये 5 ते 10 लोकांची बसण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे. आईसक्रीम शॉप बाजारपेठेत, शॉपिंग मॉल, शाळा, कॉलेज परिसरात असलं पाहिजे. यासाठी ५० ते ६० हजार रुपये इतका खर्च येईल.


रेफ्रिजरेटर घ्यावा लागेल

आईसक्रीम पार्लरमध्ये सर्वात महत्वाचा उपकरणं म्हणजे कोल्ड स्टोअर रेफ्रिजरेटर  खरेदी करावा लागेल. यासाठी १५ ते ३० हजार रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय पॅकेजिंग साहित्य, काही भांडी खरेदी करावी लागतील. आईसक्रीम पार्लरमध्ये 24 तास वीजेचा पुरवठा असणं आवश्यक आहे.


इन्वेंटरी


ग्राहकांना आईसक्रीम देण्यासाठी कच्चा माल खरेदी करावा लागणार आहे. 

आईस्क्रीम टब, वॉफल कोन्स, नटस, चोको चिप्स, व्हीप्ड क्रीम, हॉट चॉकलेट यासारख्या वस्तूंची आवश्यकता असेल. सुरुवातीला यावर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील.


मनुष्यबळ

आईसक्रीम शॉपमध्ये काम करण्यासाठी २/३ व्यक्तींची गरज आहे.भांडवल कमी असल्यास छोट्या टीमच्या साथीनं काम सुरु करु शकता .


मार्केटिंग

व्यवसाय वाढविण्यासाठी हा सर्वात महत्वाची बाब आहे. आपण किती कमाई करू शकतो हे केवळ मार्केटिंग ठरवेल. पार्लरच्या आतील डिझाईनिंगवर ब्रँडिंगपासून आपणास खर्च करावा लागतो. आपण इच्छित असल्यास, आपण हे मार्केटिंग व्यावसायिकांच्या मदतीने करू शकता.


परवाने

आईस्क्रीम पार्लर व्यवसाय उघडण्यासाठी काही परवाने घ्यावे लागतील. FSSAI कडून परवाना घ्यावा लागेल. FSSAI 15 अंकी रजिस्ट्रेशन नंबर जारी करण्यात येतो. तयार केलेले खाद्यपदार्थ एफएसएसएआयच्या गुणवत्तेच्या दर्जाचे असल्याचं स्पष्ट होतं. 


फ्रँचायझी

अमूल कंपनी  फ्रँचायझीद्वारे आइस्क्रीम व्यवसाय करण्याची संधी देते. अमूलचे आईस्क्रीम आउटलेट सुरू करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.


तुम्हाला अजून कोणत्याही व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा.


शेअर करायला आणि कंमेंट करायला विसरू नका, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी असेल धन्यवाद !!!


***ही पोस्ट अश्या लोकांपर्यंत पोहचवा ज्यांना या माहिती ची गरज आहे पण त्यांना याबद्दल माहिती नाही***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...