चॉकलेट बनवणे भाग ३ | Chocolate Making

 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!


आज या भागात चॉकलेट बनवणे या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहे


चॉकलेट तयार करण्याचे प्रशिक्षण:-

चॉकलेट तयार करण्यासाठी  जर प्रशिक्षण घ्यायचे असेल तर  सरकार मोफत ट्रेनिंग पुरवते तिथून  प्रशिक्षण घेऊ शकता. एकदा तुम्हाला बेसिक गोष्टी नीट समजल्या कि  त्यामध्ये मग नवीन नवीन कल्पना तयार करून त्याप्रमाणे चोक्लेट्समध्ये वेगवेगळे प्रकार तयार करू शकता.

 चॉकलेटसाठी पॅकेजिंग:-


चॉकलेट पॅकेजिंग  आकर्षक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जेवढे चॉकलेट पॅकेजिंग आकर्षक कराल तेवढीच  त्यासाठी अजून मागणी वाढेल. त्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आजकाल बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये  चॉकलेट्स पॅक करू शकता. किंवा वेगवेगळ्या पॅकिंगसाठी काही कल्पना असतील त्याप्रमाणे त पॅकेजिंग करू शकता. पॅकिंगसाठी मटेरियल रेडिमेड एका होलसेल विक्रेत्याकडून खरेदी करून घेऊ शकता. आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या पॅकिंगचा वापर वेगवेगळ्या चोक्लेट्सना करू शकता.


चॉकलेटसाठी किंमत कशी ठरवाल?


चॉकलेट साठी किंमत ठरवताना  सर्व लागणारे साहित्य आणि त्याचा खर्च बघून त्यामध्ये  नफा ऍड करून ती  चॉकलेटसाठी किंमत राहील. सर्वप्रथम बाहेर विकल्या जाणाऱ्या चोक्लेट्सची किंमत बघून त्याप्रमाणात नफा त्यामध्ये काढू शकता. अशा रीतीने चॉकलेट्स होलसेल किंवा कंपनीमध्ये मोठ्या ऑर्डर्स घेऊनसुद्धा विकू शकता. किंमत किलोप्रमाणे किंवा नगाप्रमाणे ठरवू शकता.

चॉकलेटसाठी लागणारे कामगार, खर्च व इन्व्हेस्टमेंट:-

चॉकलेट बनवण्यासाठी  कामगार किंवा ठेवण्याची सुरुवातीला काहीच गरज नाही. जसा उद्योग सेट होईल तसे नंतर  त्याचे दुसऱ्यांना प्रशिक्षण देऊन हाताखाली काम करण्यासाठी मदतनीस ठेवू शकता.

चॉकलेट उद्योगासाठी साठी मार्केटिंग स्ट्रॅटेजि:-

कुठलाही उद्योग सुरु करताना त्याचा चांगला प्लॅन करणे अत्यंत आवश्यक असते.त्याप्रमाणे ideas वापरून किंवा एक चांगला प्लॅन करून त्याप्रमाणे उद्योगाची मार्केटिंग विविधरित्या कशी करता येईल व त्यासाठी माल लवकरात लवकर वेळेवर ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल ह्या गोष्टी पाहणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व गोष्टीचा व्यवस्थित विचार आणि प्लॅन करून उद्योग तुम्ही अजून वाढवू शकता.

चॉकलेटसाठी मार्केटिंग:-

चॉकलेट नजीकच्या दुकानांमध्ये विकू शकता. तसेच ऑनलाईन सुद्धा विकू शकता. social मीडिया द्वारे उद्योगाचा प्रसार करून  चॉकलेट्स साठी अजून कस्टमर मिळवू शकता. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ऑनलाईन साईट वर देखील  विकू शकता.जर बजेट असेल तर स्वतःचे दुकान चालू करून चॉकलेट्स विकू शकता. अशा प्रकारे बऱ्याच पद्धतीने  चोक्लेट्सची विक्री करू शकता. काही कंपन्यांमध्ये काही सेलिब्रेशन असेल तर तिथे चॉकलेट्सची गरज असते तिथे देखील  चॉकलेट्स विकू शकता.  


अशा रीतीने  चॉकलेट हा घरीबसल्या सहजरित्या करता येणार एक चांगला उद्योग आहे. आणि ह्यापासून भरघोस नफा मिळवू शकतो.सर्व गोष्टी फक्त व्यवस्थित प्लॅन करून त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून लोकांना चांगल्या प्रतीचा असा माल देऊन  चांगले उद्योजक बनु शकता. 


मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.

३ टिप्पण्या:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...