नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!
आज या भागात मसाले तयार करण्याचा व्यवसायची माहिती घेणार आहे.
कुठलाही खाद्यपदार्थ बनवायचा म्हंटलं कि सर्वप्रथम आपण कोणते मसाले टाकायचे ह्याबद्दल विचार करतो. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्याचे प्रकार असतात. किंवा प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये विविध प्रकारचे मसाले टाकले जातात.
कुठलाही पदार्थ मसाल्यामुळे स्वादिष्ट बनतो. ह्याच मसाल्यांचे प्रमाण जर चुकीचे वापरले किंवा ते पदार्थ बनवताना कमी जास्त प्रमाणात वापरले तर तो पदार्थ स्वादिष्ट बनत नाही. हे मसाले बनवण्यासाठी प्रत्येक साहित्य हे योग्य त्या प्रमाणातच वापरावे लागते.
घरामध्ये कुठलीही भाजी बनवताना आपल्याला वेगवेगळे मसाले लागतात. ते मसाले शक्यतो कधी कुणी विकत आणते. किंवा काही घरामध्ये हे सर्व मसाले वर्षभरासाठी तयार केले जातात.
सध्या हे मसाले बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहेत. तुम्हाला सुद्धा जर घरीबसल्या अशा प्रकारचा उद्योग चालू करायचा असेल तर तुम्ही हे मसाले बनवून विकू शकता.
घरगुती मसाल्यासाठी दुकानांमध्ये भरपूर मागणी आहे. चांगल्या गुणवत्तेचे मसाले बनवून दिले तर हे मसाले विक्री चांगली होते. मसाल्यामध्ये बरेच प्रकार बनवू शकता आणि हे मसाले वेगवेगळ्या पॅकमध्ये विकू शकता.
मसाल्यामध्ये कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, लोणच्याचा मसाला, असे अनेक प्रकारचे मसाले तयार करून विकू शकता. अजून बऱ्याच प्रकारचे मसाले तयार केले जाऊ शकतात.
सुरुवातीला एक दोन प्रकारचे मसाले सुद्धा विकू शकता. हे मसाले घरच्या घरी बनवू शकता. ह्यासाठी थोडी म्हणत घ्यावी लागेल. पण मसाल्यासाठी मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्यामुळे यात फायदा देखील भरपूर आहे. सुरुवातीला एक कोणता तरी मसाला जरी विकला तरी चालू शकेल. जसे कि गरम मसाला, कांदा-लसूण मसाला, गोडा मसाला हे नेहमी लागणारे मसाले आहेत. कोणताही मसाला बनवून घरगुती व्यवसाय चालू करू शकता.
लागणारी जागा :-
मसाले तयार करण्यासाठी घरातूनच मसाले तयार करून विकू शकता. त्यासाठी स्वतंत्र जागा घ्यायची गरज लागत नाही. फक्त मसाले तयार करण्यासाठी जे कच्चे मसाले हवे असतात ते मसाले होलसेल विक्रत्याकसून विकत घेऊन ते एकत्र करून मसाला तयार करून शकता.
घरातूनच हा व्यवसाय चालू करायचा असेल तर सहजरित्या हा व्यवसाय चालू करू शकता. गिरणीमध्ये जाऊन किंवा जिथे मसाला कांडून देण्याची मशीन असते तिथून हा मसाला कांडून घेऊ शकता.
अशा प्रकारे हा व्यवसाय कोणतीही मशीन विकत न घेता केला तर जागा आणि खर्च ह्या दोन्ही गोष्टींचा खर्च आपोआपच कमी होऊन जातो.
बाजारामधून विकत घेतले जाणारे मसाले:-
भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक ठिकाणाची खाद्यसंस्कृती हि वेगळी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवले जातात.
नेहमी जेवणासाठी जेवढे मसाले आवश्यक असतात तेवढेच बनवतो आणि इतर मसाले आपण बाहेरून विकत आणतो.
मसाल्यामध्ये खालील प्रकारचे बाजारामध्ये मसाले उपलब्ध असतात.
- गरम मसाला
- कांदा-लसूण मसाला
- गोडा मसाला
- चाट मसाला
- छोले मसाला
- बिर्याणी मसाला
- कोल्हापुरी मसाला
- पंजाबी मसाला
- चिकन मसाला
- मटण मसाला
- पनीर मसाला
अशा अनेक प्रकारचे मसाले बाजारामध्ये उपलब्ध आहेत.आपण सुद्धा अशाच प्रकारचे मसाले बनवून व्यवसाय चालू करू शकता.
लोणच्याचे मसाले किंवा काही कच्च्या मसाल्यांच्या पावडर पण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मसाल्याच्या पावडर चे पाकिटे पण विकायला ठेवू शकता.
अधिक माहिती पुढील भागात पाहू....!!!
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
khup chhan
उत्तर द्याहटवाvery good
उत्तर द्याहटवा