गृह उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक माहिती भाग २

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वर्णीम मध्ये आपल स्वागत....!!!!!

मागील लेखात आपण गृह उद्योग/ व्यवसाय बाबत कौशल्य, आवड आणि व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कसे मिळवावे याची माहिती घेतली.

आज या लेखात आपण प्लॅनिंग कसे करावे, आर्थिक नियोजन, आणि व्यवसाय निवड कशी का करावी याची माहिती  पाहू.

प्लॅनिंग कसे करावे?

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी एक  business plan असणं किंवा करणे फार महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रकार चा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, किती भांडवल लागणार आहे, व्यवसाय कुठे सुरू करायचा आहे इत्यादी अनेक गोष्टींचा सखोल विचार आणि अभ्यास करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. business plan जेवढा चांगला व परिणामकारक असेल तेवढ्या प्रमाणात आणि लवकर business grow करण्यास मदत होत असते.

 आर्थिक नियोजन .

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी  महत्त्वाची वस्तू म्हणजे पैसा किंवा भांडवल. व्यवसाय सुरू करण्यासाठी जी काही पैश्याची गरज लागणार आहे तर त्याची सोय कशी करणार आहे हे आधी विचारात घ्यावे लागेल.

जर बचतीचे पैसे उपयोग करणार असाल तर उत्तमच. याशिवाय  बैंके कडून कर्ज सुद्धा घेता येऊ शकतं. एकदा व्यवसाय मार्गी लागला की वेळोवेळी त्याचे हप्ते भरुन ते लोन फेड करणे गरजेचे असते.

 आजकाल बिन भांडवली व्यवसाय पण खूप आहेत,ज्याच्यात कमीत कमी  पैसे गुंतवून सुद्धा  व्यवसाय उभा करु शकतो. 

जर व्यवसाया साठी जर घरातील एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली तरी चालेल. जसे की भाऊ, बहीण किंवा आई बाबा, किंवा इतर जवळचे कुणीही.यामुळे कर्ज घेण्याची गरज भासणार नाही शिवाय लागणारं व्याज द्यावं लागत नाही.

व्यवसाय कसा निवडावा?

ज्या क्षेत्रात आवड आहे त त्याच्याशी संबधीत असा व्यवसाय निवडावा, यामुळे लवकर यश मिळण्याची संधी मिळते. हे एक मनोवैज्ञानिक सत्य आहे. 
उदा:- जर स्वतः ला जर का खाण्याची आवड आहे तर छोट हॉटेल, कॅफे, नाश्ता सेंटर असा व्यवसाय निवडला तर जास्त यश मिळू शकतं.

कारण त्याची संपूर्ण माहिती जास्त चांगली असल्याने आवडीने करु शकतो. 

पण मुळातच जर व्यवसायाची आवड असेल किंवा नसेल  तरीही त्यात हळूहळू त्याची गोडी निर्माण होऊन यश मिळण्याची अपेक्षा वाढते.त्यामुळे स्वतः च्या आवडीचा व्यवसाय केला तर तो लवकर यशस्वी होईल आणि लवकर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

यापुढील माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल. हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. 

 

२ टिप्पण्या:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...