नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!!!
मागील काही लेखात आपण गृह उद्योग/ व्यवसाय बाबत प्लॅनिंग कसे करावे, आर्थिक नियोजन , जागा निवड, व्यवसाय नोंदणी, इत्यादीची माहिती घेतली.
आजपासून आपण या लेखात ग्रामीण भागात कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो याची सिरीज सुरू करतं असून विविध प्रकारच्या गृह उद्योग व्यवसायची माहिती घेणार आहोत.
१) आपण कोणती सेवा देऊ शकता किंवा वस्तू विकू इच्छिता उत्पादन(वस्तू).
उदा. थोडक्यात सर्विस म्हणजे कोणतीही वस्तु भाडे तत्वावर देणे आणि उत्पादन म्हणजे एखादी नवीन वस्तू स्वतः बनवून विकणे.
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या भागातील लोकांच्या गरजा काय आहेत आणि त्या भागवण्या साठी त्यांना तुम्ही काय विकू शकता याची माहिती घेणे गरजेचे आहे.
२) तुम्हाला आधी तुमच्या भागातील लोकांच्या गरजा काय आहेत आणि त्या भागवण्या साठी त्यांना तुम्ही काय विकू शकता संपूर्ण माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वरील दोन गोष्टींचा अभ्यास केला की कळेल की तुमच्या भागात कोणता उद्योग / व्यवसाय करावा.आणि तो व्यवसाय कसा करावायाची माहिती मिळेल जेणेकरून जो व्यवसाय करणार आहात तो जास्त फायदेशीर होईल.
व्यवसाय करायचा म्हंटले की त्यासाठी लागतात या गोष्टी अनुभव, भांडवल, मार्केटिंग स्किल आणि मनुष्य बळ.पण काही व्यवसाय असे देखील आहेत की ज्या मध्ये ह्या गोष्टी नसल्या तरी देखील तुम्ही यशस्वीरीत्या व्यवसाय उभा करू शकता.
ग्रामीण भागात तुम्ही कोण कोणते व्यवसाय करू शकता ते पाहू.सुरवातीला आपण तुम्हाला थोडीफार माहीती असलेले व्यवसाय पाहूया.
१) ऑनलाइन सर्विस सेंटर (ग्रामीण भागात चांगला चालणारा व्यवसाय)
जर तुमच्याकडे जुजबी कॉम्पुटर चे ज्ञान असेल तरी ग्रामीण भागात ऑनलाईन सेंटर चालू करु शकता.
त्यासाठी खर्च कमीत कमी २० ते २५ हजार येईल आणि जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या हेतूने १लाख पर्यंत खर्च येऊ शकतो.
सुरवातीच्या काळात कमी configuration असलेला कॉम्पुटर असला तरी काम होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रिंटर लागेल तो ७ते ८ हजार रुपया पासून उपलब्ध आहेत.हा व्यवसाय करण्यासाठी इंटरनेट वापरता येणे गरजेचे आहे.
या ऑनलाईन सेंटर मधून कामे करू शकता जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढून देणे,सरकारी योजनांचे फॉर्म भरणे,नोकरीचे फॉर्म भरणे,लोकांचे ऑनलाईन PF चे फॉर्म भरणे,शाळकरी मुलांच्या प्रोजेक्ट च्या प्रिंट मारून देणे, झेरॉक्स काढून देणे यां सारखी अनेक कामे इत्यादी आणि अश्या प्रकारची कामे ऑनलाईन सेंटर च्या माध्यमातून करू शकता.
ह्या व्यवसाय मध्ये नफा ७० ते ८०% च्या पेक्षा जास्त मिळू शकेल.
ग्रामीण भागात ह्या गोष्टींची नेहमीच कमतरता असते. एखादे ऑनलाईन सेंटर गावात चालू जरी असेल तरी देखील चालू करू शकता.तसेच ह्या व्यवसाया सोबतच मोबाईल व टीव्ही चे रिचार्ज,जनरल व्हरायटीज मध्ये असते त्या प्रमाणे वह्या,पेन,पेन्सिल,ग्रीटिंग यांसारखे प्रॉडक्ट विकून सुद्धा जास्तीचा नफा मिळवू शकतो.
पुढील व्यवसायांची माहिती आपण पुढच्या भागातून घेऊया.
मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.
good information...
उत्तर द्याहटवाHelpful 👌👌
उत्तर द्याहटवा